शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे महापालिका कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी उचलणार ५० टक्के भार : महापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 13:07 IST

महापालिकेला दरमहा साधारणत: २५ कोटी रूपये अतिरिक्त खर्च येणार

ठळक मुद्देबाधितांवर उपचारासाठी आकारण्यात येणाऱ्या अवास्तव बिलांवर नियंत्रण आणून कारवाईचे आदेश

पुणे : पुणे महापालिकेने सुरू केलेल्या सर्व कोविड केअर सेंटरमध्ये उत्तम प्रकारच्या सुविधा कोरोनाबाधित रुग्णांना मिळत आहेत. या ठिकाणी असलेला वैद्यकीय कर्मचारीवर्गही अहोरात्र रुग्णसेवेकरिता कार्यरत आहे. येथील उत्तम सुविधांमुळे रुग्णही आनंदी असल्याचे समाधान असल्याच्या भावना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.     एकीकडे महापालिकेचे कोविड केअर सेंटर रूग्ण सेवेत अहोरात्र कार्यरत असतानाच, शहरातील वाढत्या रूग्णसंख्येमुळे शहरी गरीब अंशदायी आरोग्य योजनेत कोरोनाच्या रूग्णांचेही ५० टक्के बिल महापालिका भरणार आहे. याबाबत सदर योजनेत उपचार मिळू शकणाऱ्या शहरातील ८० हॉस्पिटललाही कळविण्यात आले आहेत. त्यामुळे बिल वेळेत मिळत नाही यामुळे उपचारास नकार देणाऱ्या, शहरातील या ८० खासगी हॉस्पिटलमध्ये योजनेंतर्गत कोरोनाबाधितांना उपचारासाठी दाखल होता येणार आहे. या रूग्णांचे ५० टक्के बिल शहरी गरीब योजनेंतर्गत महापालिका भरणार असून, याकरिता महापालिकेला दरमहा साधारणत: २५ कोटी रूपये अतिरिक्त खर्च येणार असल्याचेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.दरम्यान, शहरातील काही खासगी हॉस्पिटलकडून कोरोनाबाधितांवर उपचारासाठी आकारण्यात येणाऱ्या अवास्तव बिलांवर नियंत्रण आणून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. तसेच याबाबतच्या तक्रारी राज्य शासनाकडे केल्या आहेत, असेही मोहोळ यांनी सांगितले. ---------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMayorमहापौर