Corona virus Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लसीकरणाची माहिती आता 'एका क्लिक'वर मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 07:27 PM2021-05-13T19:27:39+5:302021-05-13T19:28:34+5:30

कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड कार्यान्वित; लसीकरणाची सर्व माहिती आता एका क्लिकवर...

Corona virus Pune: Good news for Pune residents; Vaccination information will now be available with one click | Corona virus Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लसीकरणाची माहिती आता 'एका क्लिक'वर मिळणार

Corona virus Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लसीकरणाची माहिती आता 'एका क्लिक'वर मिळणार

Next

पुणे : पुणे शहरात लसीकरणाची मोठी मोहीम राबविली जात आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी, लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे बंद लागलेली लसीकरण केंद्र, बरेच तास रांगेत उभे राहून देखील रिकाम्या हाताने घरी परतावे लागल्यामुळे होणारी चिडचिड असे एक ना अनेक अनुभव लसीकरण मोहिमेत नागरिकांना येत आहे. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी एक सुखद आणि दिलासा देणारी आहे. नागरिकांना उद्या कोणत्या केंद्रावर किती डोस मिळणार, याची माहिती घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून पुणेकरांना लसीकरणासंदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन गुरुवारी दि (दि. १३) करण्यात आले. लसीकरणासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती आता https://www.punevaccination.in/ या संकेतस्थळावर मिळणार आहे. यावेळी ते बोलत होते. पुणे महानगरपालिका आणि एमसीसीआयए यांच्या माध्यमातून या डॅशबोर्डची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल,  एमसीसीआयए चे प्रशांत गिरभाने उपस्थित होते. 

महापौर मोहोळ म्हणाले, कोरोना विषाणूचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन, पुणे महानगरपालिका शहरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करत आहे. मात्र अनेक लसीकरण केंद्रावर असलेल्या लसीच्या कोट्यापेक्षा नागरिकांची अधिकची गर्दी होते. यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तर अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. त्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांना घर बसल्या ''PMC:Covid-19Vaccination Drive in Pune city'' या संकेत स्थळावर आपल्या जवळील लसीकरण केंद्रावर उद्या किती लस उपलब्ध होणार आहे. ही माहिती मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे शहरासाठी अधिक लसी मिळाव्यात, राज्य सरकारकडे मागणी 

पुणे शहरात आजपर्यंत पहिला आणि दुसरा डोस मिळून 9 लाख डोस नागरिकांना देण्यात आले आहे. मात्र शहराची लोकसंख्या लक्षात घेता, लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अधिकाधिक पुरवठा करावा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली.

नेमकी काय माहिती दिसणार डॅशबोर्डवर?
  
नागरिकांनी या डॅशबोर्डवर क्लिक केल्यावर त्यांनी वयोगट, लशीचा प्रकार (कोव्हॅॅक्सीन, कोव्हीशिल्ड ) डोसचा प्रकार (पहिला व दुसरा ), लसीकरण केंद्र  (सरकारी, खाजगी ) अशे पर्याय क्लिकद्वारे निवडायचे  आहेत. त्यानंतर संबधित व्यक्तीला शहरातील सर्व लसीकरण केंद्राची माहती लोकेशनसह उपलब्ध 
होणार आहे. त्या त्या लसीकरण केंद्रावर क्लिक केल्यास तेथे कुठला लस व डोस उपलब्ध आहे, याचीही माहिती मिळणार आहे.

Web Title: Corona virus Pune: Good news for Pune residents; Vaccination information will now be available with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.