Corona Virus Pune : पुणे शहरात गुरुवारी २ हजार ३९३ नवे कोरोना रुग्ण, ४ हजार १३५ रुग्णांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 20:06 IST2021-05-13T20:05:39+5:302021-05-13T20:06:03+5:30
आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४लाख ५४ हजार ४५७ वर पोहोचली आहे.

Corona Virus Pune : पुणे शहरात गुरुवारी २ हजार ३९३ नवे कोरोना रुग्ण, ४ हजार १३५ रुग्णांची कोरोनावर मात
पुणे : पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात २ हजार ३९३ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. अर्थात नवीन रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आजदेखील जास्तच आहे. दिवसभरात ४ हजार १३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
पुण्यात कोरोनाबाधित ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. यातले ५० रुग्ण शहरातील तर २५ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. शहरात एकूण १ हजार ३७२ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४लाख ५४ हजार ४५७ वर पोहोचली आहे. तर पुण्यातील सक्रीय रुग्ण संख्या २५ हजार २२२ झाली आहे. आजपर्यंतचे एकूण मृत्यू ७ हजार ५६३ झाले आहेत तर आजपर्यंत ४ लाख २१ हजार ६७२ जणांनी कोरोनावर मात केली आहेत. आज एका दिवसांत १२ हजार ७३८ चाचण्या करण्यात आल्या.