Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी १९६ नवे कोरोनाबाधित तर २८९ जणांची कोरोनावर मात  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 06:45 PM2021-07-19T18:45:49+5:302021-07-19T18:46:19+5:30

पुणे शहरातील सक्रिय रूग्णसंख्या २ हजार ८५५ वर

Corona virus Pune: 196 new corona cases and 289 people were corona free on Monday In Pune city | Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी १९६ नवे कोरोनाबाधित तर २८९ जणांची कोरोनावर मात  

Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी १९६ नवे कोरोनाबाधित तर २८९ जणांची कोरोनावर मात  

Next

पुणे : शहरात सोमवारी १९६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़  आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार २७७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३.१२ टक्के इतकी आढळून आली आहे. 

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ८५५ इतकी असून, आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४  जण हे पुण्याबाहेरील आहेत़  शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७९ टक्के इतका आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २३५ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४८७ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २७ लाख ९२ हजार ९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८४ हजार ८० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७२ हजार २५९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ६९६ जणांचा मृत्यू झाला आहे.
     --------

Web Title: Corona virus Pune: 196 new corona cases and 289 people were corona free on Monday In Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.