शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

corona virus :आशादायी आणि सुखकर ;राज्यातला पहिला कोरोनाबाधित रुग्ण बरा होण्याच्या वाटेवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 10:53 IST

संपूर्णतः दुष्काळ असताना एखादा पाण्याचा ढगही सुखकर दिलासा देतो त्याप्रमाणे देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पुण्यातला पहिले दोनही रुग्ण बरे होण्याच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना पुण्यातली ही घटना म्हणजे आशादायी  चित्र मानायला हवे. 

पुणे ; संपूर्णतः दुष्काळ असताना एखादा पाण्याचा ढगही सुखकर दिलासा देतो त्याप्रमाणे देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पुण्यातला पहिले दोनही रुग्ण बरे होण्याच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना पुण्यातली ही घटना म्हणजे आशादायी  चित्र मानायला हवे. 

 अधिक माहिती अशी की, पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सध्या ३१ इतकी आहे. त्यापैकी १९ रुग्ण पुणे तर १२ रुग्ण पिंपरी चिंचवड परिक्षेत्रात आढळले आहेत. तर राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०१ आहे. महाराष्ट्रात पहिला कोरोनाबाधित रुग्णही पुण्यातच आढळला होता.त्यामुळे पुणे प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष काळजी घेताना दिसत आहे. इतकेच नव्हे राज्यात संचारबंदी लागू झाल्याने सर्व नागरी व्यवहार मंदावले असून केवळ आपत्कालीन सेवा सुरु आहे. तसेच जिल्हा अंतर्गत सीमाही बंद करण्यात आल्या असून लोकांना जास्तीत जास्त घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आयोजित एकदिवसीय जनता कर्फ्यू वगळल्यास नागरिकांनी पुन्हा घराबाहेर पडण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अखेर कलम १४४नुसार संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यातही काहीशी अशीच स्थिती असून आपत्कालीन सेवा वगळता पीएमपी बस सेवा ,सर्व बाजारपेठा, दुकाने, सेवा बंद आहेत.

दुसरीकडे नायडू रुग्णालयात दाखल असलेल्या पहिल्या दोन रुग्णांचा १४ दिवसानंतरचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आज त्यांची दुसरी चाचणी होणार असून तोही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. अर्थात त्यांना पुढे काही दिवस घरीच राहावे लागणार आहे. मात्र ते दोघे घरी गेल्यास कोरोनाचे रुग्ण बरे होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्यांच्या आजच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. दरम्यान हे रुग्ण पती-पत्नी असून ४० जणांच्या ग्रुपसोबत खासगी ट्रॅव्हल कंपनीने दुबईस गेले होते. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या