शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

Corona virus : पोलिसांची 'हुशारी' : मास्क कारवाई ८ ऑक्टोबरची आणि पावती ११ ऑक्टोबरची 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 23:37 IST

पुढील दिवसांचे 'टार्गेट' आधीच पूर्ण करण्यासाठी लढविली शक्कल

ठळक मुद्देयासंदर्भात नागरिक करणार पोलीस आयुक्तांकडे तक्रार

पुणे : सध्या कोरोनामुळे शहरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर मास्कची कारवाई सुरू आहे. राज्यामध्ये सर्वाधिक महसूल पुण्याने या कारवाईद्वारे दिला आहे. आतापर्यंत ३ कोटी ६५ लाख रुपयांचा दंड या कारवाईमधून वसूल करण्यात आला आहे. परंतु, हेच टार्गेट पोलिसांची डोकेदुखी ठरू लागले आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलीस कर्मचारी पुढील दिवसांच्या तारखा टाकून पावत्या देऊ लागल्याचे समोर आले आहे. असाच एक प्रकार उघडकीस आला असून यासंदर्भात नागरिकाने पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे 'लोकमत'ला सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ४२ वर्षीय व्यक्ती खाजगी कार्यालय मध्ये नोकरी करते. ते कामानिमित्त हडपसरकडून कोंढव्याला जात होते. हडपसर आकाशवाणी येथे त्यांना पोलिसांनी अडवले. त्यांनी मास्क परिधान केलेला होता. परंतु, हा मास्क नाकावरून खाली घसरल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. मी व्यवस्थित मास्क घातलेला आहे असे सांगूनही पोलिसांनी तुम्ही आम्हाला पाहून मास्क वर घेतला असे कारण देत त्यांची पाचशे रुपयांची दंडाची पावती केली. 

पोलिसांनी दिलेल्या पावतीवर ८ तारीख टाकली जाणे अपेक्षित होते. परंतु, पावतीवर ११ ऑक्टोबर अशी तारीख लिहिण्यात आलेली होती. त्यांनी घरी जाऊन पाहिले असता पावतीवर ११ ऑक्टोबरची तारीख असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी 'दादा' ग्रुपचे कार्यकर्ते बाळासाहेब अटल यांच्याशी संपर्क साधला. त्यांना घडलेला प्रकार कथन केला. अटल यांनी 'लोकमत'शी संपर्क साधून हा प्रकार निदर्शनास आणून दिला.

कारवाई ८ ऑक्‍टोबरला म्हणजे गुरुवारी करण्यात आलेली आहे. परंतु, पावती मात्र ११ ऑक्टोबर म्हणजेच रविवारची देण्यात आलेली आहे. केलेल्या कारवाईची पावती तीन दिवसांनंतरच्या तारखेने देऊन पोलीस पुढील दिवसांचे 'टार्गेट' आधीच पूर्ण करून घेत असल्याचे दिसत आहे. रविवारी बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांना-अधिकाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी असते. नागरिकांनाही सुट्टी असते. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी असते. त्या दिवशीच्या 'टार्गेट'चा  'बॅकलॉग' भरून काढण्यासाठी पोलिसांनी लढवलेली ही शक्कल उजेडात आली आहे. अशा प्रकारच्या कारवाया शहरात अन्य ठिकाणी सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पोलिसांना योग्य त्या सूचना देण्याची मागणी केली जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त