शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus :शहरातील लोक परतल्याने गावांवरही ‘कोरोना’चे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 22:30 IST

शहरांमधून आलेल्या नागरिकांना तपासण्यासाठी गावांमध्ये कोणत्याही स्वरुपाची यंत्रणा सध्या दिसत नाही.

ठळक मुद्देमुंबई-पुण्यातील लोकांचे गावाकडे लोंढे सुरूच बारामतीसह भोर, वेल्हा, मुळशी, दौंड, इंदापूर भागातील लोक पुण्यामध्ये काम करतात.

पुणे : मुंबई-पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने व जिल्हा प्रशासनाने संपूर्ण ‘शटडाऊन’चे संकेतदेखील दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध कामानिमित्त, नोकऱ्यांसाठी मुंबई, पुण्यामध्ये वास्तव्यास असलेले नागरिक भीतीने आपापल्या गावाकडे परतत आहेत. गेल्या एक-दोन दिवसांत गावा-गावात शेकडो नागरिक परत आले आहेत. शहरी भागांसारखी आरोग्य व्यवस्था गावांमध्ये नसल्याने व पुणे-मुंबईमधून आलेल्या या नागरिकांमुळे सध्या शहरासोबत ग्रामीण भागामध्ये गावा-गावांमध्ये ‘कोरोना’चे मोठे सावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरांमधून आलेल्या नागरिकांना तपासण्यासाठी गावांमध्ये कोणत्याही स्वरुपाची यंत्रणा सध्या दिसत नाही. यामुळे पुणे जिल्ह्यासाठी ही मोठी धोक्याची घंटा ठरू शकते. पुणे जिल्ह्यातील प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील घरटी लोक विविध कामधंद्यासाठीअथवा नोकरीसाठी मुंबईमध्ये आहेत. बारामतीसह भोर, वेल्हा, मुळशी, दौंड, इंदापूर भागातील लोक पुण्यामध्ये काम करतात. पुणे शहरामध्ये ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल २८ वर जाऊन पोहोचली आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी संख्या तब्बल ३८ वर गेली आहे. यामुळे पुणे, मुंबईमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबईमध्ये संबंधित प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच कोरोनाच्या धास्तीने शहरामध्ये राहणारे बहुतेक नागरिक आपल्या गावांकडे परत जात आहे. यामुळे सध्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शहरामधून आलेल्या नागरिकांची जत्रा-यात्रांसारखी गर्दी होऊ लागली आहे. आंबोली गावालगतच्या आठ-दहा गावांसाठी हे प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेव आधार आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत आंबोलीसह लगतच्या गावांमध्ये किमान ७००-८०० पुणे-मुंबईमधील नागरिक आले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या ग्रामीण भागातील गावांवरही ‘कोरोना’चे सावट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात बहुतेक तालुक्यांमध्ये आठ-दहा गावे मिळून एखादे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. यातही दुर्गम तालुक्यांमध्ये १०-२० मैल गावांमध्ये साधे मेडिकलदेखील नाही. गावातील लोक आजारी पडल्यास थेट तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. सध्या पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट उभे राहिले आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थितीदेखील बिकट आहे. खेड तालुक्यातील दुर्गम भागातील आंबोली ग्रामपंचायतींच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकच परिचारिका कार्यरत असून, साध्या सर्दी, खोकल्याचीदेखील पुरेशी औषधे उपलब्ध नाहीत.--------------------प्रत्येक गावांमध्ये तपासणी सुरू करणारपुणे, मुंबईसह राज्याच्या विविध शहरांमधून नागरिक आपल्या गावांकडे परत आले आहेत. शहरी भागातून गावांमध्ये आलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. यामुळे येत्या एक-दोन दिवसांत प्रत्येक गावांमध्ये तपासणी सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत साडेसहा लाखांपेक्षा अधिक घरांमध्ये तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा सर्व गावांची तपासणी करण्यात येईल. - आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBaramatiबारामतीIndapurइंदापूरpassengerप्रवासी