शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : पुणेकरांनो,सावधान! दोन आठवड्यांपासून सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 12:14 IST

रुग्णवाढीचा हाच दर कायम राहिला तर चिंता वाढण्याची लक्षणे

ठळक मुद्दे पुणे शहरातील रुग्णवाढीचा दर २४ वरुन २८ टक्क्यांवर दोन आठवड्यांपासून सक्रिय रुग्ण वाढले : मास्क वापरण्यासोबतच खबरदारी अत्यावश्यक

पुणे : शहरातील रुग्णवाढीचा दर गेल्या काही दिवसात २४ टक्क्यांवरुन २८ टक्क्यांवर गेला असून ही बाब चिंताजनक आहे. पुढील आठवड्यापर्यंत ही वाढ कमी होण्याची शक्यता आहे. ही वाढ कमी न झाल्यास चिंता वाढू शकते असे  पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.कोरोनाचा आकडा दिवसागणिक फुगत चालला आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण चांगले असले तरीदेखील बाधित होणाऱ्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. दोन आठवड्यांपुर्वी पर्यंत बाधित होणाऱ्यांचे दिवसाकाठी सरासरी प्रमाण साडेचौदा हजार होते. परंतू, या आठवड्यात हे प्रमाण सोळा ते साडेसोळा हजारांच्या घरात आले आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा दोन आठवड्यात एक हजारांची सरासरी वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागण्याची वेळ आली आहे.

लॉकडाऊनमधून शिथीलता देत अन लॉक सुरु करण्यात आले. केंद्र शासनापाठोपाठ राज्य शासनानेही सवलत दिल्यानंतर पालिकेनेही ब-याच प्रमाण निर्बंध हटविले. गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे.  ऑगस्ट महिन्यामध्ये रुग्णवाढीची टक्केवारी २४ ते २५ टक्के आहे. तेच प्रमाण या महिन्यामध्ये २७ ते २८ टक्क्यांवर गेले आहे. कोरोना नागरिकांमध्ये पसरत चालल्याचे हे लक्षण असून दिवसाकाठी दोन हजारांपेक्षा अधिक रुग्णांची वाढ होत असल्याचे दिसत आहे. रुग्णवाढीचा हाच दर कायम राहिला तर चिंता वाढण्याची लक्षणे आहेत. पालिकेकडून पोलिसांच्या मदतीने उपाययोजना सुरु आहेत. आठवड्याभरात ही वाढ कमी होण्याची शक्यता असल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.=====पालिकेकडून पोलिसांच्या मदतीने मास्क न घालणा-या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. ही कारवाई आणखी तीब्र करण्यात येणार असून नागरिकांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्यावी. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये. प्रशासनाला सहकार्य करा. प्रशासकीय यंत्रणा सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र काम करीत आहे. नागरिकांनीही ही साथ गांभिर्याने घेऊन प्रशासकीय यंत्रणेला साथ द्यावी.- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका====शहरातील ७० टक्के बेड फक्त कोरोनासाठीशहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांच्या एकूण क्षमतेपैकी ७० टक्के खाटा केवळ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याकरिता राखीव आहेत. उर्वरीत ३० टक्के खाटा या कॅन्सर, हृदयरोग, यकृताचे आजार आदी गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी आहेत. एवढ्या कमी क्षमतेवर त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.====रुग्ण वाढ रोखण्याकरिता  ‘हे’ करा...1. कोणत्याही सबबीशिवाय मास्क घालाच.2. नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या घरी जाणे शक्यतो टाळा.3. सातत्याने सॅनिटायझरचा वापर करा.4. एकमेकांशी पुरेसे सुरक्षित अंतर राखून संवाद साधा.5. गर्दी करणे, बाहेर खाणे टाळा.6. लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करुन घ्या.7. स्वत: सुरक्षित रहा आणि दुसऱ्यांना सुरक्षित ठेवा.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तPoliceपोलिस