शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Corona Virus : पुणे शहरात सोमवारी फक्त ९८ कोरोनाबाधित; एप्रिलपासून प्रथमच वाढीचा आकडा शंभरीच्या आत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 19:36 IST

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार २५

ठळक मुद्देतपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्हची टक्केवारी ही पण आज सर्वाधिक कमी नोंद

पुणे : शहरात एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधितांची नित्याची वाढ कधी दोनशे ने तर कधी अडीशेने आतापर्यंत वारंवार नोंदविले गेली. पण आज ( दि. २५ जानेवारी) शहरात केवळ ९८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे.

आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज आढळून आलेल्या ९८ रुग्णापैकी ९५ टक्के रुग्ण हे लक्षणे विरहित आहेत. तर यातील निम्याहून अधिक रुग्णांना घरीच विलनिकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे.शहरात शुक्रवारी कोरोनाबाधित १२३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २ हजार ३८५ संशयितांची तपासणी करण्यात आली़  तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ४.१ टक्के इतकी आहे. तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्हची टक्केवारी ही पण आज सर्वाधिक कमी नोंद झाली आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २०५ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९६ इतकी आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार २५ इतकी आहेत. आज दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७३९ इतकी झाली आहे. शहरात आजपर्यंत १० लाख ६ हजार २३४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८४ हजार ७८० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.यापैकी १ लाख ७८ हजार १६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.     ==========================

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल