शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : कोरोनाच्या बंदोबस्तातील 'टेन्शन' दूर करण्यासाठी पोलिसांना ऑनलाइन मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 12:19 IST

बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना ताण, भीती, नैराश्य पोलिसांना जाणवत आहे.

ठळक मुद्देपोलिसांसाठी नवीन उपक्रम : ध्वनिचित्रफितीद्वारे दिली जातेय माहिती वीस मिनिटांची ध्वनिचित्रफीत असून शहरातील प्रत्येक पोलिसाला उपलब्ध

पुणे : लॉकडाऊनच्या काळात गेल्या दीड महिन्यापासून बंदोबस्तासाठी कार्यरत असणाऱ्या पोलिसांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून पोलिसांच्या मनातील शंका, समस्यांचे निराकरण केले आहे. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलिसांना ऑनलाइन पद्धतीने ध्वनिचित्रफितीद्वारे ही माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.आतापर्यंत दहा विषयांवरील ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात भावनिक प्रज्ञावंत वर्ग उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण पूर्वीपासून देण्यात येत असले तरी पोलीस दलाचा गाडा हाकणाऱ्या पोलीस शिपायांना या मार्गदर्शन वर्गाचा लाभ मिळावा म्हणून गेल्या चार वर्षांपासून प्रशिक्षण देण्यात येत आहे. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या  नागरिकांबरोबर कसे वागावे, त्यांच्या समस्या काय आहेत तसेच पोलिसांना जाणवणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येते. कोरोनामुळे गेल्या दीड महिन्यापासून शहरातील पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे भावनिक प्रज्ञावंत वर्गाचे नियमित केले जाणारे आयोजन काहीसे लांबले होते. पोलीस आयुक्तालयात दररोज शंभर पोलिसांच्या गटाला मार्गदर्शन करण्यात येते.

बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना ताण, भीती, नैराश्य पोलिसांना जाणवत आहे. स्वत: भावनिक प्रज्ञावंत अभ्यासक्रम पूर्ण केला असून ज्ञान वाढविण्यासाठी विविध विषयांवरील पुस्तके वाचली. पोलिसांना जाणवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी टाळेबंदीत पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली खास ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आली आहे. पोलिसांच्या भावना समाजावून घेणे, त्यांना सामाजिक अंतर पाळण्यास सांगणे, स्वच्छता, स्वत:ची आणि कु टुंबियांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, असे या वर्गाचे संयोजक तानाजी सरडे यांनी सांगितले.

एकाच वेळी शंभर पोलीस कर्मचारी पोलीस आयुक्तालयात जमू शकत नसल्याने पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली टाळेबंदीत असलेल्या पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी खास ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आली आहे. वीस मिनिटांची ध्वनिचित्रफीत असून समाजमाध्यमातून ही ध्वनिचित्रफीत शहरातील प्रत्येक पोलिसाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कपिल पवार, पोलीस नाईक तानाजी सरडे, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर दुसंगे यांनी ध्वनिचित्रफीत तयार केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस