शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

Corona virus : अबब.! पुणे शहरात बुधवारी आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ; एकाच दिवसात वाढले ११४७ कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 23:35 IST

बरे झालेल्यांचा आकडा १५ हजारांच्या वर

ठळक मुद्दे४०१ रुग्ण अत्यवस्थ, १९ जणांचा मृत्यू

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत बुधवारी १ हजार १४७ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २४ हजार १६८ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ५८७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४०१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ८ हजार ४०० असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. बुधवारी रात्री दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ११४७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १६, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ७९३ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३३८ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४०१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ७९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३२२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात बुधवारी १९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७७० झाली आहे. दिवसभरात एकूण ५८७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ४३० रुग्ण, ससूनमधील २१ तर  खासगी रुग्णालयांमधील १३६ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १४ हजार ९९८ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ८ हजार ४०० झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ९५० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ४५ हजार ९४४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच नव्याने सुरू करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे ७७७ लोकांची तपासणी करण्यात आली असून या किटद्वारे एकूण ४ हजार ७२७ जणांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcommissionerआयुक्तNavalkishor Ramनवलकिशोर राम