सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : सध्या जिल्ह्यात सर्वांधिक म्हणजे तब्बल ६५० कोरोना बाधित रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये दररोज किमान शंभर नवीन रुग्णांची भर पडत आहे. यामुळे या रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टरस्, नर्स आणि अन्य कर्मचा-यांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे सध्या दररोज केवळ पीपीए किटवर तब्बल ५ लाख रुपयांचा खर्च होत असून, या खर्चामध्ये वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढतच आहे. आज अखेर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ हजारांच्या वर पोहचली आहे. यामुळे ससून, नायडूसह अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु झाले आहेत. परंतु यापैकी सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण ससून रुग्णालयामध्ये आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील गंभीर रुग्ण देखील ससून रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहेत.
Corona virus : अबब ! ससून रुग्णालयात पीपीए किटसाठी दिवसाला ५ लाखांचा खर्च; दररोज लागतात ६०० ते ७०० किट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 07:10 IST
ससून रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहे.
Corona virus : अबब ! ससून रुग्णालयात पीपीए किटसाठी दिवसाला ५ लाखांचा खर्च; दररोज लागतात ६०० ते ७०० किट
ठळक मुद्देकोविड केअर सेंटरमध्ये ड्युटी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना पीपीए किट घालणे बंधनकारक ससून, नायडूसह अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु