शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्यांची संख्या ८ हजारांच्या पुढे ,बुधवारी ५०१ रुग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 12:07 IST

विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांपैकी २७७ जण अत्यवस्थ

ठळक मुद्देदिवसभरात ५०१ रुग्ण वाढ : २७७ रुग्ण अत्यवस्थ, १७ जणांचा मृत्ययू 

पुणे : शहरात एकूण रुग्णांपैकी ८ हजार १०० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. बुधवारी दिवसभरात ५०१ रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १३ हजार ६५४ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या २७३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २७७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ५ हजार ९ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. बुधवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ५०१ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २३६ तर खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २७७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २२१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात बुधवारी १७ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५४५ झाली आहे. दिवसभरात एकूण १५५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ९६ रुग्ण, ससूनमधील ०५ तर  खासगी रुग्णालयांमधील ५४ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार १०० झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ५ हजार ९ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ४१६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ९७ हजार २२४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल