शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Corona virus : पुणे शहरात दिवसभरात वाढले २४६ रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ५ हजार ४२७

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 21:09 IST

दिवसभरात १४० रुग्ण घरी : तब्बल १७६ रुग्ण अत्यवस्थ तर ०९ रूग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देशहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १७६ जणांची प्रकृती चिंताजनक पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २०८ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३३ रुग्ण दाखल

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा मंगळवारी २४६ ने वाढला असून एकूण रुग्णसंख्या ५ हजार ४२७ झाली आहे.  बरे झालेल्या १४० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण २ हजार २७९ आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १७६ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मंगळवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २४६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २०८ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३३ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १७६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १३२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात मंगळवारी ०९ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २७३ झाली आहे. दिवसभरात एकूण १४० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ८१ रुग्ण, ससूनमधील ०४ तर  खासगी रुग्णालयांमधील ५५ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ८७५ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार २७९ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २०४४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४३ हजार ९०७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १५७१, ससून रुग्णालयात १५५ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५५३ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMayorमहापौरNavalkishor Ramनवलकिशोर राम