शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

Corona virus : पुणे शहरात एकाच दिवसात वाढले सर्वाधिक २०२ रुग्ण; दिवसभरात ११ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 21:41 IST

रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १४९ रुग्ण अत्यवस्थ

ठळक मुद्दे एकूण रूग्णांची एकूण संख्या झाली ३ हजार २९५ बरे झालेले ६८ रुग्ण घरी, तर एकूण एक्टिव्ह रुग्ण १४१२ आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ६९८

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा एकाच दिवसात २०२ ने वाढला असून ही आजवरची सर्वाधिक वाढ आहे. दिवसभरात बरे झालेल्या ६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात एकूण रूग्णांची एकूण संख्या ३ हजार २९५ झाली असून प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण १ हजार ४१२ आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १४९ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शनिवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २०२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०७, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ९६ तर खासगी रुग्णालयांमध्ये ९९ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १४९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १०८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शनिवारी ११ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १८५ झाली आहे. दिवसभरात एकूण ६८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयातील ५७ रुग्ण, ससूनमधील ०२ तर  खासगी रुग्णालयांमधील ०९ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ६९८ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ४१२ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १२०५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ३० हजार २२४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ८९९, ससून रुग्णालयात १०९ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ४०४ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर रामcommissionerआयुक्तMayorमहापौर