शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे विभागात कोरोना बाधितांची संख्या एकूण ८८३ ; मृत्यू ६२

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 00:00 IST

आजपर्यंत विभागामधील ४५ लाख ८६ हजार ६१२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण

ठळक मुद्देबरे झालेले रूग्ण 143 : 12 रुग्ण गंभीर स्थितीत असून उर्वरीत रूग्णांवर औषधोपचार सुरू

पुणे: विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ८८३ झाली आहे. विभागात १३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले. अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या ७०० आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण गंभीर स्थितीत असून उर्वरीत रूग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागातील मिळून एकूण रुग्णसंख्या ८८३ वर गेली आहे. तर कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या बुधवारी 59 झाली आहे.  जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिका हद्दीत 772, पिंपरी चिंचवड मध्ये 59, नगरपरिषद व कॅन्टोन्मेंट हद्दीत 27 व जिल्हा परिषदेच्या हद्दीत 25 जण असे एकूण 883 रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. तर आतापर्यंत 143 कोरोनाबधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.आजपर्यत विभागामध्ये एकुण १० हजार ७१७  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १० हजार २१०  नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी ९ हजार २६४ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून ८८३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.आजपर्यंत विभागामधील ४५ लाख ८६ हजार ६१२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यात १ कोटी ७६ लाख ३६ हजार ६७३ जणांची तपासणी केली आहे. त्यापैकी ८६५ जणांना अधिक तपासणीसाठी सुचित करण्यात आले आहे.

पुणे जिल्हा - ८१३ बाधित, मृत्यू -५५,

सातारा-१६ बाधित,  मृत्यू-२,

सोलापूर- ३० बाधित, मृत्यू-३,

सांगली- २७ बाधित,१ मृत्यू,

कोल्हापूर- १० बाधित, मृत्यू ०

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू