शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

Corona virus : पुणे शहरातील कोरोनाग्रस्त संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर; सोमवारी २३४ नवीन रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 20:50 IST

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २३० जणांची प्रकृती चिंताजनक

ठळक मुद्देदिवसभरात तब्बल २३६ रुग्ण झाले बरे, दिवसभरात १० जणांचा मृत्यूकोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४५८

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दहा हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन पोचला असून सोमवारी २३४ नवीन रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ९ हजार ८९० झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या २३६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २३० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ९८६ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. सोमवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २३४ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १६१ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५८ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २३० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १९० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात सोमवारी १० मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४५८ झाली आहे. दिवसभरात एकूण २३६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १४५ रुग्ण, ससूनमधील ०५ तर  खासगी रुग्णालयांमधील ८६ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ४४६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ८९० झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार २३४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ७३ हजार ६५९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये २ हजार ५२, ससून रुग्णालयात १३३ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ८०१ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर रामMayorमहापौर