शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

Corona virus : पुण्यातील सणस मैदानावरील 'कोविड सेंटर' मध्ये तिरस्कार नव्हे तर मिळते आपुलकी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 15:42 IST

एरवी पालिकेच्या विलगीकरण कक्ष आणि कोरोना रुग्णालयांच्या सुविधांबाबत तक्रारीच अधिक ऐकायला मिळतात. परंतु, सणस कोविड केअर सेंटर त्याला अपवाद ठरले आहे..

ठळक मुद्देबाबुराव सणस मैदानातील सुखावणारे चित्र.., कोरोना रुग्णांच्या सुविधांवर दिला जातो भर

लक्ष्मण मोरे - 

पुणे : कोरोना रुग्णांना समाज तिरस्कारभरल्या नजरेने पाहतो, पण इथे रुग्णांना मिळते आपुलकी... स्रेह. पालिकेच्या बाबुराव सणस मैदानातील एका इमारतीमध्ये असलेल्या 'कोविड केअर सेंटर' रुग्णांची पहिली जाणारी सुविधा, डॉक्टर आणि नर्सेसकडून दिवसभरात केली जाणारी सेवा-शुश्रूषा यामुळे रुग्ण समाधान व्यक्त करीत आहेत. एरवी पालिकेच्या विलगीकरण कक्ष आणि कोरोना रुग्णालयांच्या सुविधांबाबत तक्रारीच अधिक ऐकायला मिळतात. परंतु, सणस कोविड केअर सेंटर त्याला अपवाद ठरले आहे. दिवसभरात तीन वेळा केली जाणारी खोल्या, पॅसेज, स्वच्छतागृहे यांची स्वच्छता, सॅनिटायझेशन, उपचारांमधील तत्परता, उत्तम प्रतीचे जेवण, रूग्णांची दिवसभारत दोन वेळा केली जाणारी तपासणी, मनोरंजनाची केलेली सोय यामुळे याठिकाणी सकारात्मक चित्र पहायला मिळते आहे. दिल्लीचे केंद्रीय पथक, राज्याचे पथक, विभागीय अधिकारी, पालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, नेमण्यात आलेले सनदी अधिकारी अशा सर्वांनी भेट दिलेले हे पहिले केंद्र ठरले आहे. इथे मिळणाºया सुविधा, उपचार आणि आपुलकीच्या वागणुकीमुळे शहराच्या विविध भागांतील रुग्ण सुद्धा याच ठिकाणी आम्हाला ठेवा असे सांगत आहेत. खासगी दवाखान्यामधील महागड्या सुविधांच्या तुलनेत कुठेही कमी नसलेल्या या केंद्रात उपचार घेणारे रूग्ण समाधान व्यक्त करीत आहेत.----------काय आहेत सुविधा* उत्तम प्रतीचे दोन वेळचे जेवण-नाश्ता-चहा* दिवसातून दोन वेळा सॅनिटायझेशन* पॅसेज, स्वच्छतागृहांची सतत स्वच्छता* रुग्णांना घरचे जेवण, फळे देण्याची सोय* औषधोपचारांमध्ये तत्परता आणि सातत्य* सहायक आयुक्तांचे वैयक्तिक लक्ष-----------या केंद्रात एकूण १२५ खोल्या आहेत. सर्व खोल्यांध्ये स्वच्छतागृहांची स्वतंत्र व्यवस्था आहे. सद्य:स्थितीत १२० रुग्ण असून आतापर्यंत ७०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ------------केंद्रावर पाच डॉक्टर्स, सहा नर्स असे तुटपुंजे वैद्यकीय मनुष्यबळ आहे. तरीदेखील येथील कामकाज सुरळीत आणि दर्जेदार होते आहे. केंद्राची जबाबदारी डॉ. अनिल राठोड, ठाकूर मॅडम सक्षमपणे सांभाळत असून सहायक क्षेत्रीय आयुक्त आशिष महाडदळकर जातीने लक्ष घालून काम करीत आहेत.------------याच केंद्रावर स्वाब तपासणी केंद्रही उभारण्यात आलेले आहे. याठिकाणी दिवसाला १५० ते २०० नागरिकांची स्वाब तपासणी केली जाते. -----------मला सेवा-स्वच्छता-आपुलकीचा अनुभव याठिकाणी आला. सर्व डॉक्टर्स, कर्मचारी अत्यंत प्रेमाने वागतात. सर्वांची काळजी घेतात. काळजीपोटी कधीकधी रागावतातही. परंतु, घरातील वातावरण असावे असे वातावरण तेथे आहे. मला घरापासून दूर आल्याची जाणीवही झाली नाही. सकाळच्या चहापासून नाश्ता, जेवण आणि औषधांच्या वेळा कधीही चुकवण्यात आल्या नाहीत. सर्वांच्या बोलण्यात आश्वासकता आणि आपुलकी असल्याने लवकर बरे होण्यास मानसिक बळ मिळाले.- प्राजक्ता हिंगे, लक्ष्मीनगर, पर्वती-----------मी, माझी पत्नी माझें सहा महिन्यांचे बाळ असे तिघेही पॉझिटिव्ह आहोत. याठिकाणी आम्ही तिघेही उपचार घेत आहोत. येथील वातावरण सकारात्मक आहे. कुठेही तणाव, रुग्णालय असल्याचा भास होत नाही. सर्वांची प्रेमळ वागणूक आहे. औषध आणि जेवणाच्या वेळा पाळल्या जातात. डॉक्टर, नर्स खूप काळजी घेतात. स्वच्छता चांगली आहे. - कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfoodअन्नHealthआरोग्य