शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : राहायला घर नाही; खायला अन्न नाही अन् हाताला काम नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 12:45 IST

लाखभर स्थलांतरितांचा आक्रोश : बेघरांच्या तर हालांना पारावर नाही

ठळक मुद्देकाही स्वयंसेवी संस्था, संघटना, वैयक्तिक स्तरावर काम करणारे कार्यकर्ते वगळता दुर्लक्षित

राजू इनामदार  पुणे : कारखाने बंद, बांधकामे बंद, लहान-मोठे उद्योग व्यवसाय बंद! यामुळे हजारो कामगारांचा मोठा प्रश्न कोरोना निर्मूलनासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झाला आहे. काही स्वयंसेवी संस्था, संघटना, वैयक्तिक स्तरावर काम करणारे कार्यकर्ते वगळता कोणाचेही या विषयाकडे लक्ष नाही.पुणे शहर तसेच परिसरात काही लाख लोक या कामांसाठी म्हणून परगाव, परराज्यातून आलेले आहेत. एखादी खोली घेऊन चारपाच जणांनी एकत्र रहायचे, दिवसरात्र काम करायचे, पैसा साठवायचा व तो घराकडे पाठवून कुटुंब जगवायचे अशी त्यांची पद्धत आहे. स्वत:ला रहायला, खायला, प्यायला चांगले काही नसले तरी त्यांना चालते. काम मात्र त्यांना रोजच्या रोज हवे असते व त्यातून मिळणारे पैसेही. कारण त्यासाठीच त्यांनी राहते गाव सोडलेले असते.लॉकडाऊनमुळे या सर्वांसमोरच तगून राहण्याची समस्या निर्माण झाली आहे. राष्ट्रीय एकात्मता समितीच्या माध्यमातून नितीन पवार यासाठी काम करतात. त्यांना ओंकार मोरे, चंदनकुमार, नीलेश वाघमारे, चेतन ववळे हे साह्य करतात. हडपसर परिसरात फिरून हांडेवाडी व अन्य काही ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांची माहिती घेतली असता त्यांना तब्बल १ हजार कामगार बेघर सापडले. ठेकेदार पळून गेलेला, हातातील पैसे संपलेले, साठवलेले धान्यही संपले, आता करायचे तरी काय व जायचे तरी कोणाकडे अशा चिंतेत हे सगळे होते. कोणीही त्यांची साधी विचारपूसही करायला तयार नव्हते.संतूलन संस्थेचे प्रा. बी. एम. रेगे मागील २३ वर्षांपासून अशा स्थलांतरित मजुरांसाठी काम करत आहेत. ते म्हणाले, ‘‘पुण्यात १ लाखच काय, त्यापेक्षा जास्त संख्येने असे लोक आहेत. त्यांच्या आरोग्य तसेच दैनंदिन राहण्याची नेहमीच हेळसांड होते, कोरोना काळात तर त्यांना कोणीच वाली राहिलेला नाही. संस्था त्यांना सध्या अन्नधान्याचा पुरवठा करत आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीचीही व्यवस्था आहे. पुण्याच्या चारही बाजूंना असे लोक आहेत. संस्था त्यांचा शोध घेते व त्यांच्यासाठी काम करते. आंध्र, उत्तर प्रदेश, बिहार इथून सर्वाधिक लोक आलेले आहेत. त्यांचे ठेकेदार पळून गेले आहेत. त्यामुळे सगळेच हवालदिल झाले आहेत. भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोल्याही त्यांना सोडून द्यावा लागल्या असल्यामुळे रहायचे कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.’’ 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEmployeeकर्मचारीMIDCएमआयडीसी