Corona virus News : पुणेकरांना तब्बल आठवड्याभरानंतर दिलासा; सोमवारी ४०७७ तर पिंपरीत २१२५ नवे कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 09:52 AM2021-04-06T09:52:27+5:302021-04-06T09:52:37+5:30

पुणे शहरात ३,२४० रुग्ण झाले बरे तर ३६ जणांचा मृत्यू 

Corona virus News: Pune residents relieved after a week; 4077 on Monday and 2125 new corona in Pimpri | Corona virus News : पुणेकरांना तब्बल आठवड्याभरानंतर दिलासा; सोमवारी ४०७७ तर पिंपरीत २१२५ नवे कोरोनाबाधित

Corona virus News : पुणेकरांना तब्बल आठवड्याभरानंतर दिलासा; सोमवारी ४०७७ तर पिंपरीत २१२५ नवे कोरोनाबाधित

Next

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असली तरी मागील आठवड्याभरातील रुग्णवाढ सोमवारी कमी झाली. सोमवारी दिवसभरात ४ हजार ७७ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात ३ हजार २४०  रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील ९१९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४२ हजार ७४१ झाली आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९१९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ३ हजार ९५२ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ३६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ४८८ झाली आहे. पुण्याबाहेरील १० मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिवसभरात एकूण ३ हजार २४० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ४५ हजार ८९२ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख ९४ हजार १२१ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४२ हजार ७४१ झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १८ हजार ७२० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १५ लाख ७६ हजार ३४७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

..........
पिंपरीत २१५२ जण पॉझिटिव्ह, ५१४० निगेटिव्ह
पिंपरी : महापालिका परिसरातील दाट लोकवस्तीत कोरोनाचा विळखा वाढत आहे. काल पॉझिटिव्ह रुग्णांनी उच्चांक गाठला होता. आज एक हजारांनी रुग्ण कमी झाले आहेत. दिवसभरात २ हजार १५२ रुग्ण सापडले असून १ हजार ८१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ५ हजार १७४ जणांना डिस्चार्ज दिला आहे.  दाट लोकवस्तीत कोरोना वाढला आहे. पंचवीस हजार लसीकरणाची मोहीम प्रशासनाने जाहिर केली होती. ती फेल झाली असून केवळ पंधरा हजार लसीकरण करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात  कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल ३३०० आलेली रुग्णसंख्या हजारांनी कमी झाली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ५ हजार ५१३ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी ५ हजार १४०  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ५५  जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ३ हजार ८०४ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज पाच हजार एक जणांना डिस्चार्ज दिला आहे.
............................
 कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. कालच्या तलनेत पाचशेंनी अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख २८ हजार ४५० वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५३ हजार ०८० वर गेली आहे.
..................................
चौदा जणांचा बळी
कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या कमी झाली. शहरातील १४ आणि शहराबाहेरील २ अशा एकूण १६ जणांचा बळी घेतला आहे. त्यात शहरातील ९ पुरूष आणि ५ महिलांचा समावेश आहे. त्यात तरुण आणि ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मृतांची संख्या २ हजार ०७९ वर पोहोचली आहे.
......................
१५ हजार जणांना लसीकरण
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. मात्र, एका दिवसात पंचवीस हजार लसीकरणाची मोहीम फेल झाली असून केवळ पंधरा हजार लसीकरण करण्यात आले. शहरातील महापालिकेच्या ५९ आणि खासगी २१ अशा एकूण ८० केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिका रुग्णालयात १३ हजार ६६८  जणांना लसीकरण करण्यात आहे. तर खासगी रुग्णालयांसह १५ हजार ६३७  जणांना लस देण्यात आली. वयवर्षे ४५ पेक्षा अधिक असणाऱ्या १५ हजार ३९१ जणांना लस देण्यात आली. त्यामुळे एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या १ लाख ९८ हजार ७८४ वर पोहोचली आहे.

Web Title: Corona virus News: Pune residents relieved after a week; 4077 on Monday and 2125 new corona in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.