शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus News : बारामतीत प्रथमच प्लाझ्मा थेरपीचा वापर; कोरोना रुग्णाला मिळाले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 11:33 IST

या थेरपीद्वारे इंदापुर तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकीय नेत्याला जीवदान मिळाले आहे.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत ३९ कोरोनाबाधित आढळले रुग्ण

बारामती : कोरोनावर प्रभावी गुणकारी ठरलेल्या प्लाझ्मा थेरपीचा बारामती शहरात प्रथमच वापर करण्यात आला आहे. या थेरपीद्वारे इंदापुर तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकीय नेत्याला जीवदान मिळाले आहे.  कोरोनाच्या रुग्णावर प्लाझ्मा थेरपी परिणामकारक ठरते.मात्र, बारामतीत रेमडेसिव्हिर इंजेक्शन आदी औषधांचा वापर करुन रुग्ण कोरोनामुक्त करण्यावर भर दिला जात होता. अद्याप या थेरपीचा वापर करण्यात आलेला नव्हता. प्रथमच ही थेरपी जीवदान देणारी ठरली आहे. शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात या थेरपीचा वापर केल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारल्याने सांगितले.संबंधित रुग्णाला १२ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, डॉ. राहुल मस्तुद,  डॉ. महेश जगताप, डॉ. निर्मल वाघमारे, डॉ. समाधान चवरे, डॉ. रणजित मोहिते, डॉ. नरुटे  यांनी या रुग्णावर उपचार सुरु केले.मात्र, सर्व उपचार करुन अपेक्षित सुधारणा न झाल्याने प्लाझ्मा थेरपीचे उपचार करण्याचा निर्णय डॉ. मस्तुद यांनी घेतला. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी पुण्यातून काही तासात प्लाझमा ची सोय केली.शहरात प्रथमच ही थेरपीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. दरम्यान, शहर आणि तालुक्यातील कोरोनाचा आलेख घसरल्याने बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.गेल्या २४ तासांत ३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकूण आरटीपीसीआर नमुने १८१ पैकी एकूण पॉझिटिव्ह- १७, खाजगी प्रयोग शाळेमार्फत तपासलेले एकूण आरटीपीसीआर - २८ त्यापैकी पॉझिटिव्ह -५कालचे एकूण अँटिजेन ८६, त्यापैकी पॉझिटिव्ह-१३ शहरात १८ तर ग्रामीणमध्ये २१ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत.       

बारामती रूग्णसंख्या- ३२८५        बरे झालेले रुग्ण - २५१३      कोरोनामुळे बळी - ८२

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल