शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

Corona Virus News : पुणे शहरातील कोरोना चाचण्या घटल्या; सोमवारी दोनशे नवे रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 19:40 IST

शहरात शनिवारपर्यंत १३ ते १४ टक्क्यांवर गेलेली पॉझिटिव्हची टक्केवारी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दहा टक्क्यांवर आली आहे..

ठळक मुद्देसोमवारी १८१ जण कोरोनामुक्त शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४२२ गंभीर कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरूपुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ९२ हजार ५१८ जणांची कोरोना तपासणी

पुणे : दिवाळीच्या सुट्ट्यानंतर व शाळा सुरू होणार या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेली कोरोना चाचणीसाठीची गर्दी कमी झाल्याने, शहरातील चाचण्यांचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून आले आहे. सोमवारी दिवभरात केवळ २ हजार १३६ चाचण्या झाल्या असून, यामध्ये २०६ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.    

शहरात शनिवारपर्यंत १३ ते १४ टक्क्यांवर गेलेली पॉझिटिव्हची टक्केवारी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दहा टक्क्यांवर आली आहे. दरम्यान दिवाळी सणापूर्वी दहा पंधरा दिवस उसळलेली गर्दी, दिवाळी सणाचे दिवस व दिवाळी होऊन सात दिवस उलटले असले तरी, शिक्षक व शिक्षेकतर कर्मचाऱ्यांच्या तपासणी व्यतिरिक्तच्या इतर नागरिकांच्या तपासणीचे प्रमाण फारसे वाढले नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.यामुळे शहरात कोरोनाची दुसरी लाट येणार की नाही याचे भाकित लागलीच करणे शक्य नाही. किंबहुना या लाटेची शहरात शक्यताही नसल्याचे काही वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे़     राज्य शासनाच्या निर्णयानुसार २३ नोव्हेंबरपासून माध्यमिक शाळा सुरू होणार होत्या. यामुळे दिवाळीनंतर म्हणजेच १७ नोव्हेंबरपासून अनेकांनी कोरोना चाचणी करून घेण्यासाठी गर्दी केली होती. याचा परिणाम तपासणीचे प्रमाण वाढल्यावर दिसून आले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पूर्वीप्रमाणेच ‘आयसीएमआर’ च्या निर्देषानुसाच ज्यांना लक्षणे आहेत, अशा नागरिकांचीच तपासणी करण्यात येत आहे. यामुळे पुन्हा तपासणीची संख्या ही दोन हजारावर आली आहे.    -----------सोमवारी १८१ जण कोरोनामुक्त     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिवसभरात रविवारच्या तुलनेत तपासणीचे प्रमाण निम्म्याने कमी झाले असून, दिवसभरात २ हजार १९६ जणांनी कोरोना चाचणी केली़ यात २०६ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. आज १८१ जण कोरोनामुक्त झाले असून, १२ जणांचा मृत्यू झाला आहे़ यात ३ जण पुण्याबाहेरील आहेत.     शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४२२ गंभीर कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २५५ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर १ हजार १०४ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.     पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ९२ हजार ५१८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.यापैकी १ लाख ६७ हजार १८८ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५७ हजार ८३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत ४ हजार ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे.शहरातील सक्रिय (अ‍ॅक्टिव्ह) रूग्ण संख्या ही ४ हजार ९१७ आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका