पुणे : शहरात बुधवारी कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक असून, आज दिवसभरात ३८० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ तर नव्याने २१७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज करण्यात आलेल्या तपासणीच्या तुलनेत केवळ ८.१ टक्के नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचार पर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ३५९ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २३३ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर ९९६ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ६ जण पुण्याबाहेरील आहेत़ पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ६१ हजार ३९९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे़ यापैकी १ लाख ६३ हजार ८३६ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५४ हजार ८६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आत्तापर्यंत ४ हजार ३६०जणांचा मृत्यू झाला आहे़ ----------------------------------कोरोनाचा प्रभाव कमी होत असला तरी, आजपर्यंत शहरातील ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या ही १ हजारच्या पुढेच होती. ती आज प्रथमच एक हजारच्या आत आली असून, आज केवळ ९९६ जण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. कोरोना संसर्गाचा प्रभाव जास्त होता, त्यावेळी ज्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा लागत होता तो आता निम्म्याहून कमी होऊन ५० टक्क्यांखाली आला आहे.
Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी ३८० जण कोरोनामुक्त; २१७ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 18:21 IST
तपासणीच्या तुलनेत केवळ ८ टक्के पॉझिटिव्ह
Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी ३८० जण कोरोनामुक्त; २१७ नवे रुग्ण
ठळक मुद्देपुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ६१ हजार ३९९ जणांची कोरोना तपासणी१ लाख ६३ हजार ८३६ जण पॉझिटिव्ह ; १ लाख ५४ हजार ८६५ जण कोरोनामुक्त