शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

Corona virus news : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात ३५१ तर पिंपरीत १६७ नवे कोरोनाबाधित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 21:11 IST

पुणे शहरात आतापर्यंत ८ लाख ३७ हजार ४६६ रूग्णांची तपासणी

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ३५१ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ४२३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४२५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार ३०४ झाली आहे.            उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४२५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २५० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १७५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, १ हजार १४२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४ मृतांची नोंद करण्यात आली आहे.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ४८६ झाली आहे. पुण्याबाहेरील ६ मृत्यूची नोंद करण्यात आली. दिवसभरात एकूण ४२३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६१ हजार ९७९ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७१ हजार ७६९ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार ३०४ झाली आहे.   -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ७३६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ३७ हजार ४६६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

......पिंपरीत नवे १६७ रुग्ण; दिवसभरात ६७ कोरोनामुक्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. शनिवारी १६७ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९३,२५५ झाली. तर दिवसभरात ६७ जण कोरोनामुक्त झाले. ३६७८ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ३,१६१ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.

शहरात शनिवारी दिवसभरात सहा रुग्ण दगावले. यात महापालिका हद्दीतील चार रुग्णांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १६६० तर महापालिका हद्दीबाहेरील ६८२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात १३७८ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ३५९४ जणांना घरी सोडण्यात आले. तर ८९९ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका