शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

Corona Virus News :पुणे शहरात शनिवारी ३ हजार ४६३ तर पिंपरीत १ हजार ६९४ नवे कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 10:24 PM

पुण्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच....

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी तब्बल २ हजार ५८४ रुग्ण बरे झाले आहेत. तर, दिवसभरात ३ हजार ४६३ रूग्णांची वाढ झाली. विविध रुग्णालयातील ६२१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ३० हजार ८३२ झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६२१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, २ हजार २९४ रुग्ण ऑक्सिजनवर असून दिवसभरात ३० मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार १९१ झाली आहे. पुण्याबाहेरील ५ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण २ हजार ५८४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख १८ हजार ६६३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख ५४ हजार ६८६ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ३० हजार ८३२ झाली आहे.   -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १७ हजार ६३३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १४ लाख १७ हजार १९४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

......

पिंपरीत १६९४ नवे रुग्ण; दिवसभरात १२४३ जण कोरोनामुक्त

पिंपरी : कोरोनाच्या रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. शहरात शनिवारी दिवसभरात १६९४ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर १२४३ जण कोरोनामुक्त झाले. शहरातील कोरोना पॉझिटव्ह रुग्णांची संख्या एक लाख ३२ हजार २६६ झाली आहे. त्यात महापालिका हद्दीतील एक लाख १४ हजार ८९१ तर महापालिका हद्दीबाहेरील आठ हजार ५३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात शनिवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात महापालिका हद्दीतील चार तर शहराबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १९६१ झाली आहे, तर महापालिका हद्दीबाहेरील ८२९ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात ६७५० संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ४१९२ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. १९४९ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ६२९९ जणांना घरी सोडण्यात आले. तर २५४३ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ३५५ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ७४ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. शहरात शनिवारी १५,५१४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २,५४३ रुग्णालयात तर १२,८७१ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस