शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Corona Virus News : पुणे शहरात रविवारी २९२ तर पिंपरीत ९४ कोरोनाबाधितांची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 12:09 IST

पुणे शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ४ हजार ९७ इतकी

पुणे : शहरात रविवारी २९२ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ४७० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २ हजार ८८३ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही १०.१२ टक्के इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ३८७ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २२६ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर शहरातील ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्याची संख्या ८५८ इतकी आहे.       शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ४ हजार ९७ इतकी आहेत. आज दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला असून,  यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६१३ इतकी झाली आहे.     शहरात आजपर्यंत ९ लाख ४ हजार ६८९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७७ हजार ८७२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ६९ हजार १६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.     ==========================पिंपरी १०४ कोरोनामुक्त, २०२७ जणांना डिस्चार्ज  पिंपरी :  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिवसभरात ९४ जण पॉझिटिव्ह आढळले असून १०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनाने पाच जणांचा बळी घेतला आहे. १ हजार ७३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.गेल्या तीन चार दिवसांत वाढलेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. शहरातील विविध रुग्णालयात २ हजार २२०  जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी १ हजार ७३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ४२१ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात २ हजार o२७ जणांना डिस्चार्ज  दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या ७६६ वर पोहोचली आहे...............................कोरोनामुक्त वाढले कोरोनामुक्तांचा आलेख वाढला आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९२ हजार ७७९ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६  हजार १३७ वर पोहोचली आहे...........मृतांचा आलेख वाढला  कोरोनाचा विळखा सैल होत असून पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदरही कमी झाला आहे. गुरूवारी शहरातील पाच आणि शहराबाहेरील तीन अशा एकूण आठ जणाचा बळी घेतला  आाहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाshravan hardikarश्रावण हर्डिकर