Corona Virus News: 273 new corona outbreaks in Pune and 123 in Pimpri on Sunday | Corona Virus News : पुणे शहरात रविवारी २७३ तर पिंपरीत १२३ नवे कोरोनाबाधित 

Corona Virus News : पुणे शहरात रविवारी २७३ तर पिंपरीत १२३ नवे कोरोनाबाधित 

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरात २७३ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ३४५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २०६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ४९८ झाली आहे.   

 उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २०६ जणांची प्रकृती चिंताजनक  आहे. तर, २९३ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. तर, पुण्याबाहेरील ६ मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ७०३ झाली आहे. 
 रविवारी एकूण ३४५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७५ हजार ९७३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ८३ हजार १७४ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ४९८ झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार २०५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ९ लाख ८१ हजार १२२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
....
पिंपरीत १२३ नवे कोरोनाबाधित

पिंपरी : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा पुन्हा कमी झाला आहे. दिवसभरात १२३  जण पॉझिटिव्ह आढळले असून १५१  जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनाने एकाचा बळी घेतला आहे.  मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे.  तर १ हजार ५३२ जणांना डिस्चार्ज दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा कमी झाला असून कोरानामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरातील विविध रुग्णालयात १ हजार ४६४ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी १ हजार ३५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार २ हजार ४३२ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दाखल रुग्णांची संख्या  ६२२ वर पोहोचली आहे.
..............................
कोरोनामुक्त झाले १५१  
दिवसभरात १५१ जण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५ हजार ५६३ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९८ हजार ८६१ वर पोहोचली आहे.
..........
कोरोनामुळे एकाचा बळी
शहरात कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे.  शहरातील एकाचा बळी घेतला आहे. त्यात दिघी येथील ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे. आजपर्यंत झालेल्या मृतांमध्ये पुरूष, साठ वर्षांवरील ज्येष्ठांचा समावेश अधिक असल्याचे दिसून येत असून तरूणांचा समावेश दिसून येत आहे. कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या १ हजार ७८६ वर पोहोचली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Virus News: 273 new corona outbreaks in Pune and 123 in Pimpri on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.