Corona virus news : पुणे शहरात गुरूवारी २५८ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ११४ नवे कोरोनाबाधित रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 09:14 PM2020-12-10T21:14:29+5:302020-12-10T21:14:49+5:30

पुणे शहरात आजपर्यंत ८ लाख ५२ हजार ८०१ जणांची कोरोना तपासणी..

Corona virus news : 258 new coronavirus patients in Pune city on Thursday and 114 in Pimpri-Chinchwad | Corona virus news : पुणे शहरात गुरूवारी २५८ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ११४ नवे कोरोनाबाधित रुग्ण 

Corona virus news : पुणे शहरात गुरूवारी २५८ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ११४ नवे कोरोनाबाधित रुग्ण 

Next
ठळक मुद्देपुणे शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ८२ इतकी

पुणे : शहरात गुरूवारी २५८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २५५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ७९५ संशयितांची तपासणी करण्यात आली. 
    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४१३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २३७ जण व्हेंटिलेटरवर आहेत़  तर १ हजार ५५ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ८२  इतकी आहे. आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला असून, यातील २ जण पुण्याबाहेरील आहे.शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ५२२ इतकी  झाली आहे. 
    शहरात आजपर्यंत ८ लाख ५२ हजार ८०१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७३ हजार १५५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ६३ हजार ५५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़.
    ========================

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ११४ कोरोनाबाधित 
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ११४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे. २९४ जण कोरोनावर मात केली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या आता ९३ हजार ९२८ वर पोहचली असून, यापैकी, ९० हजार ४७३ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७९४ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Web Title: Corona virus news : 258 new coronavirus patients in Pune city on Thursday and 114 in Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.