शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी २ हजार ३४२ तर पिंपरीत ११८७ कोरोना रूग्णांची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 21:21 IST

पुणे आणि पिंपरीत कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे.

पुणे : शहरात सोमवारीही कोरोनाबाधितांची वाढ कायम असली तरी, एकूण तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २० टक्क्यांच्या आत आल्याचे थोडेसे दिलासादायक चित्र पाहण्यास मिळाले आहे. आज दिवसभरात ११ हजार ८९० जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ हजार ३४२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ही टक्केवारी १९.६९ टक्के इतकी आहे.

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २३ हजार ६२ इतकी झाली आहे़ सध्या शहरात ५२४ गंभीर कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, ९५८ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार चालू आहेत. आज दिवसभरात १ हजार ७८९ जण कोरोनामुक्त झाल्याचीही नोंद घेण्यात आली आहे़ दरम्यान आज दिवसभरात १७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहेत. 

शहरात आजपर्यंत १३ लाख ३८ हजार ६८९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ३७ हजार ७३६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ९ हजार ६०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत़  शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ६८ इतकी झाली आहे.

================

पिंपरीत ११८७ पॉझिटिव्ह रुग्ण 

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा वाढला असून ११८७ जण पॉझिटिव्ह आढळले असून ८८६ कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे अकरा जणांचा बळी गेला आहे. गेल्या चार महिन्यात एक दिवशी अकरा जण मृत्यू होण्याची पहिलीच घटना आहे.

पिंपरी चिंचवड शहरात दाखल रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. औद्योगिकनगरीतील विविध रुग्णालयात ६ हजार १०९ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी ४ हजार ८४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ हजार ११० जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दाखल रुग्णांची संख्या १ हजार ८८३ वर पोहोचली आहे. आज ६५ हजार ७८३ जणांना डिस्चार्ज दिला आहे.

 ............

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असताना कोरोनामुक्तीचा आलेखही कमी झाला आहे. दिवसभरात ८४६ कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख १० हजार ४०४ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २३ हजार ५५२ हजार ७३८ वर पोहोचली आहे.

....... 

मृत्युदर वाढला 

कोरोनाचा विळखा वाढत असून मृत्युदर वाढत आहे. दिवसभरात ११ जणांचा कोरोनाने झाला आहे.त्यात सात पुरूष आणि चार महिलेचा समावेश आहे. आजपर्यंत कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या १ हजार ९२३ वर पोहोचली आहे.  

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस