शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Corona virus : धनकवडी - सहकारनगर परिसरात कोरोना रुग्ण एका महिन्यात सातपट; मृत्यू तिप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 2:49 PM

धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावरील चिंतेची टांगती तलवार अजूनही कायम मृत्यू तिप्पट तर बरे झालेले रुग्ण निम्म्या पेक्षा जास्त

ठळक मुद्देसुरुवातीच्या काळात सहकारनगर आणि नंतर धनकवडीमधील काही भाग कंटेन्टमेंट झोनबरे झालेले रुग्ण निम्म्या पेक्षा जास्त

पांडुरंग मरगजे-धनकवडी : धनकवडीसहकारनगर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत गेल्या एक महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत सात पटीहून अधिक वाढ झाली असून मृत्यू झालेल्यांच्या संख्येत ही तिप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावरील चिंतेची टांगती तलवार अजूनही कायम आहे. या भागात २१ मार्चला पहिला रुग्ण सापडल्यापासून गेल्या दोन महिन्यात कोरोना रुग्ण संख्येची आकडेवारी दोनशे चव्वेचाळीसपर्यंत पोहोचली आहे. मात्र यातील निम्म्या पेक्षा जास्त रुग्ण बरे होवून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी ही बाब निश्चितच दिलासादायक आहे

उपनगरांमधील दत्तनगर आंबेगावमध्ये पहिला रुग्ण २१ मार्च रोजी आढळला होता. २१ एप्रिल अखेर ही संख्या ३१ होती तर सहा जणांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीच्या काळात सहकारनगर आणि नंतर धनकवडीमधील काही भाग कंटेन्टमेंट झोन ठरले होते. मात्र नुकतीच धनकवडी मधील कंन्टेटमेंट झोन शिथील करण्यात आला आहे. तर सहकारनगर प्रभाग क्रमांक ३५ मधील वाढती रुग्ण संख्या चिंतेत भर टाकणारी आहे. येथील लहान मोठ्या झोपडपट्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रुग्ण संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. 

एकीकडे प्रभाग क्रमांक ३५ सहकारनगर, प्रभाग क्रमांक ३९ धनकवडी मधील कोरोना बाधीतांची संख्या वाढत असतानाच दुसरी कडे कात्रज मध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र मे च्या पहिल्याच आठवड्यात प्रभाग क्रमांक ४० कात्रज मधील अंजनी नगर परिसरात एकाच दिवशी तीन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तब्बल दोन महिने सुरक्षित असलेल्या कात्रज भाग कोरोनाबाधित झाला. प्रशासन आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या उपाययोजनांमुळे कात्रजमध्ये अजूनही परिस्थिती आटोक्यात आहे. तर नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक ४२ मध्ये सुद्धा रुग्ण संख्या नियंत्रणात आहे. विशेषत: या दोन्ही (प्रभाग ४० व ४२ ) प्रभागामध्ये एकही कोरोना बाधितांचा मृत्यू झाला नाही.

टॅग्स :DhankawadiधनकवडीSahakar NagarसहकारनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू