शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुण्यातील ‘नायडू’ने करून दाखवलं! डॉक्टर,कर्मचारी यांपैकी एकही नाही कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 19:49 IST

पहिल्या दिवसापासूनच डॉक्टरांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे योग्यप्रकारे प्रशिक्षण आणि सर्वप्रकारची दक्षता..

ठळक मुद्देनायडू रुग्णालय हे पुणे महापालिकेचे संसर्गजन्य आजारांसाठीचे एकमेव रुग्णालयदररोज ६० ते  ७० पीपीई कीटचा वापरससूनसह पुण्यातील खासगी रुग्णालयांमधील परिचारिका व डॉक्टरांनाही कोरोनाचा विळखा

पुणे : ससूनसह पुण्यातील खासगी रुग्णालयांमधील परिचारिका व डॉक्टरांनाही कोरोनाने विळखा घातलेला असताना नायडू रुग्णालयाने मात्र कोरोनाचा शिरकाव होऊ दिलेला नाही. जवळपास दीड महिने होऊनही या रुग्णालयात काम करणाऱ्या एकालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. पहिल्या दिवसापासूनच डॉक्टरांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे योग्यप्रकारे प्रशिक्षण आणि सर्वप्रकारची दक्षता घेतली जात असल्याने सर्वजण सुरक्षित आहेत.नायडू रुग्णालय हे पुणे महापालिकेचे संसर्गजन्य आजारांसाठीचे एकमेव रुग्णालय आहे. त्यामुळे येथील डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना संसर्गजन्य आजारांशी सामना करण्याचा अनुभव आहे. स्वाईन फ्लु आल्यानंतरही सध्या काम करणारे काही डॉक्टर व परिचारिका कार्यरत होत्या. पण कोरोनाचे संकट थोडे अधिक धोक्याचे असल्याने जास्त सतर्कता ठेवावी लागणार होती.

राज्यात कोरोनाचे वारे वाहू लागल्यानंतर सुरूवातीला पुण्यातील नायडू आणि मुंबईतील कस्तुरबा ही दोनच रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली होती. जानेवारी महिन्यापासूनच परदेशातून आलेल्या प्रवाशांची रीघ लागण्यास सुरूवात झाली होती. त्यांची तपासणी करून विलगीकरण कक्षात दाखल करणे, घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याचे काम सुरू होते. पण हे काम सुरू करण्यापुर्वी तपासणी करणारे तसेच विलगीकरण कक्षात जाणारे सर्व डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची संपुर्ण माहिती देण्यात आली. त्यासाठी पीपीई कीट घालताना, काढताना काय दक्षता घ्यायची, याचेही प्रशिक्षण दिले जात होते. राज्यातील पहिला रुग्ण ९ मार्च रोजी आढळून आल्यानंतर तर हे रुग्णालय हॉटस्पॉट बनले. नायडू म्हटले की लोकांना भिती वाटू लागली. पण तिथे काम करणारा प्रत्येक जण केवळ दक्षता घेत होता आणि आजही घेत आहेत.नायडूमध्ये खासगी रुग्णालयांसारखीच स्वच्छता ठेवली जात आहे. पीपीई कीट तसेच इतर वैद्यकीय साहित्याची योग्यप्रकारे विल्हेवाट, डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेचीही काळजी घेतली जात आहे. सध्या तिथे एका शिफ्टमध्ये दररोज ५५ जण काम करतात. पण आतापर्यंत त्यातील एकालाही कोरोनाची संसर्ग झालेला नाही.दुसरीकडे ससून रुग्णालयामध्ये दि. ३१ मार्चपासून रुग्ण दाखल होण्यास सुरूवात झाली. पण १५ दिवसांच्या आत तीन परिचारिकांना कोरोनाची लागण झाली. आता एक डॉक्टरही बाधित झाले आहेत. तसेच एका खासगी रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टरांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. काही दिवसांपासून ससूनमध्ये डॉक्टर व परिचारिकांची व्यवस्था हॉटेल, शासकीय विश्रामगृहात करण्यात आली आहे. पण नायडूमधील बहुतेक जण घरूनच ये-जा करतात. त्यांच्या कुटूंबियांनाही कोरोनाचा धोका आहे. पण नायडू रुग्णालयामध्ये घेतल्या जात असलेल्या दक्षतेमुळेच सर्वजण कोणत्याही दडपणाशिवाय काम करत आहेत.------------------दररोज ६० ते  ७० पीपीई कीटचा वापरनायडू रुग्णालयामध्ये सध्या जवळपास ८० रुग्ण असून आतापर्यंत शुक्रवारपर्यंत २९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. या रुग्णांवरील उपचार, स्वॅब घेणे, विलगीकरण कक्षाची स्वच्छता या कामांसाठी संबंधितांना पीपीई कीट घालूनच जावे लागते. सुरूवातीच्या दिवसात रुग्ण कमी असल्याने दररोज केवळ १० ते १५ कीट लागत होते. आता दररोज ६० ते ७० कीटचा वापर होत आहे. आतापर्यंत सुमारे दीड हजार कीट वापरण्यात आले आहेत.----------डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना कोरोनाविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षितेबाबत दक्षता घेतली जाते. प्रामुख्याने स्वच्छता, पीपीई कीटचा वापर यावर अधिक भर असतो. त्यांच्याकडूनही काळजी घेतली जात असल्याने अद्याप कोणालाही संसर्ग झालेला नाही.- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी-------------आम्ही सुरक्षित राहिलो तर इतरांची सेवा करू शकू, या भावनेतून स्वत:ची काळजी घेत असतो. हे संसर्गजन्य रुग्णालय असल्याने सर्वांना दक्षता काय घ्यायची हे माहित आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवले आहेत. मास्कचा वापर बंधनकारक आहे. संशयित किंवा रुग्णांशी बोलताना, त्यांच्याकडील साहित्य हाताळताना दक्षता घेतली जाते.- डॉ. नम्रता चंदनशिव, नायडू रुग्णालय

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस