शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : कोरोना विषाणूंपासून स्वत:च्या बचावासाठी नायडू रुग्णालयातील डॉक्टर 'अशी ' घेतात काळजी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 14:02 IST

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांनाच या विषाणूने गाठल्याच्या घटना जगात अनेक ठिकाणी घडल्या आहेत...

ठळक मुद्देविशेष पोशाखाशिवाय प्रवेश नाही : दोन वेळा आंघोळ आणि दर तासाने हात धुणे 

पुणे : सगळे जग कोरोना विषाणूंपासून दूर राहण्याची काळजी घेत असताना महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील अनेक डॉक्टर, परिचारिकांना मात्र रोज याच विषाणूंच्या सान्निध्यात वावरावे लागते. कोरोनाबाधित आणि संशयितांवर उपचार करताना हा विषाणू स्वत:लाही गाठू शकतो, याची शक्यता गृहीत धरून त्यांना हे जोखमीचे काम करावे लागत आहे. त्यामुळेच कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सर्व शक्यता बाद करण्यासाठीच्या सर्व मार्गांचा अवलंब त्यांच्याकडून केला जात आहे. कोरोना विषाणूसंदर्भातले उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांनाच या विषाणूने गाठल्याच्या घटना जगात अनेक ठिकाणी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या मंडळींकडून विशेष काळजी घेतली जात आहे. या संदर्भातली माहिती त्यांनी दिली.   कोरोना रुग्ण आणि संशयितांच्या सान्निध्यात असणाऱ्यांचे कपडे, रुमाल आदी वस्तू इतर कोणालाही वापरू दिल्या जात नाहीत. विशेष पोशाख परिधान केल्याशिवाय रुग्णालयाच्या या कक्षात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. हा पोशाखही वारंवार निर्जंतुक केला जातो. रुग्णाच्या तपासणीसाठी डॉक्टर आणि परिचारिकेला दर एक तासाने जावेच लागते. या तपासणीनंतर लगेचच हात स्वच्छ धुतले जातात. ‘डॉ. नायडू रुग्णालयात काम करतो हे ज्यांना माहिती आहे, त्यांची आमच्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलली आहे,’ असे मत एका डॉक्टरांनी व्यक्त केले. एरवी महापालिकेचे दवाखाने व तिथे काम करणारे डॉक्टर समाजातील एका विशिष्ट वर्गाकडून कायम टीकेचे लक्ष्य केले जातात. कोरोना या जागतिक आपत्तीच्या काळात मात्र हे रुग्णालय व तेथील डॉक्टर, परिचारिका आता मात्र देशवासियांच्या अभिमानाचा विषय झाले आहेत. ..............रुग्णालयातले कामाचे तास संपल्यानंतर हे डॉक्टर आणि परिचारिका कधीही थेट घरात जात नाहीत. घरापासून दूर अंतरावर ते थांबतात. त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती त्यांच्यासमोर प्लॅस्टिकचे अथवा धातूचे एखादे भांडे ठेवते. त्यात हातातील घड्याळ, पेन, पट्टा, मोबाईल अशा वस्तू ठेवल्या जातात. त्यावर जंतुनाशक फवारले जाते. त्यानंतरही बराच काळ त्या वस्तू तशाच ठेवल्या जातात. 

संबधित डॉक्टर आणि परिचारिकेच्या शरीरावरही जंतुनाशकाचा फवारा मारला जातो. यानंतर घरातल्या कोणत्याच वस्तूला, व्यक्तीला स्पर्श न करता ही मंडळी आंघोळीसाठी थेट स्नानगृहात जातात. आंघोळीपूर्वी सर्व कपडे साबणाच्या गरम पाण्यात भिजवले जातात. रोजच्या रोज कपडे बदलले जातात. रोज दोनदा गरम पाण्याने आंघोळ केली जाते. दर तासाला जंतुनाशकाने हात स्वच्छ केले जातात. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर