शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोना उद्रेकाच्या काळात मुस्लिमांनी टाळावा सामुदायिक नमाजाचा अट्टाहास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 18:32 IST

काही मुस्लीम आडमूठेपणा करीत मशिदीत, इमारतीच्या गच्चीवर सामुदायिक नमाज पठण करत असल्याचे आले समोर

ठळक मुद्देकोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम सत्यशोधक मंडळाने केले आवाहन

पुणे - काही मुल्ला, मौलाना, मौलवी यांनी पत्रके काढून मुस्लीम समाजाला शुक्रवारची नमाज आणि शब्बेबरात नमाज आपआपल्या घरी अदा करण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाही काही मुस्लीम आडमूठेपणा करीत मशिदीत, इमारतीच्या गच्चीवर सामुदायिक नमाज पठण करत असल्याचे लक्षात आले आहे. मुस्लिमांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्याचे भान बाळगले पाहिजे, असे आवाहन कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम सत्यशोधक मंडळाने केले आहे. 

"सब कुछ अल्लाह के मर्जी से होगा, वह बचाने वाला है वगैरे वक्तव्य करुन मुस्लिमांना दुआ करायला सांगितले जात आहे. अंधश्रद्धाही पसरवल्या जात आहेत. अशा वर्तनामुळे काय हाहाकार माजणार आहे याचे गांभीर्य विचारात घेऊन  मुस्लीमांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्याचे भान बाळगले पाहिजे. मुस्लीम बहुल वस्तीत सार्वजनिक शिस्तीचे कठोर पालन करण्याची गरज आहे. जग थांबले आहे आपणही थांबले पाहिजे, मंदिर बंद आहे, चर्च बंद आहे. मशिदीही बंद ठेवल्या पाहिजेत. देश आणि मानवतेसमोरील हे युध्द लढताना सर्वांसोबत मुस्लिमांनी सजग राहून सहकार्य करावे, असे आवाहन मुस्लीम सत्यशोधक मंडळाने केले आहे. 

मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आज जगात कोरोना विषाणूचे थैमान घातले आहे. हजारोंच्या संख्येने लोक मृत्युमूखी पडत आहेत. शासन-प्रशासन यंत्रणा सर्व स्तरावर सर्व शक्तीनिशी हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतानाही हतबल झाले आहेत. अनेक मुस्लीम देश सर्व प्रकारच्या  सामुदायिक प्रार्थना, धार्मिक सण, जुम्माचा नमाज मस्जिद मध्ये अदा न करता आपआपल्या घरी अदा करण्याचा  उपदेश करीत आहेत. पंतप्रधान आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार आवाहन करुन मंदिर, मशीद, दर्गा, चर्च, विहार, गुरुद्वारा व इतर  धार्मिक स्थळे बंद ठेवावीत असे आदेश दिले आहेत. लोकांनी आपआपल्या घरात थांबून स्वत:ची काळजी  घ्यावी असे निर्देश दिले आहेत. या भयावह वातावरणात आरोग्य, प्रशासन, पोलीस क्षेत्रातील अधिकारी - कर्मचारी जीवाची बाजी लावून ही महामारी रोखण्यासाठी तसेच रुग्णावर उपचार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. मुस्लीमांनीही स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्याचे भान बाळगले पाहिजे. ------------------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMuslimमुस्लीम