शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
2
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
3
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
4
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
6
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
7
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
8
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
9
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
10
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
11
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
12
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
13
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
14
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
15
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
16
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
17
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
18
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
19
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
20
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?

Corona virus : महापालिकेचे 'कोविड केअर सेंटर' कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी आशेचा किरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 3:14 PM

समाजातील तळागाळातील व्यक्तीलाही कोरोना संसर्ग झाल्यास, उच्चप्रतीची सेवा मिळावी यासाठी पुणे महापालिकेचे ३२ ‘कोविड केअर सेंटर’ शहरात कार्यरत आहेत

ठळक मुद्देलक्षणे नसलेले अथवा सौम्य लक्षणे असलेले साधारणत: साडेचार हजार रूग्ण घेत आहेत उपचार सकाळचा चहा, नाष्टा, संध्याकाळी चहा, दोन वेळचे जेवण देण्यासाठी येथे स्वतंत्र किचन व्यवस्था खासगी हॉस्पिटलने आपले कोविड-१९ रूग्णांसाठीचे दरपत्रकच केले तयार

नीलेश राऊत-पुणे : सरकारी दवाखाना आणि तेथील व्यवस्था, राहण्याची अबाळ, जेवणाचा दर्जा, वेळेत उपचाराची भ्रांत आदी कारणास्त सरकारी दवाखाने नको रे बाबा ! अशी मानसिकता सर्वसामान्यांची झाली असतानाच, कोरोना आपत्तीच्या काळात पुणे महापालिकेच ‘कोविड केअर सेंटर’ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये हे सर्व समज दूर करणारे ठरले आहेत. उपचारासाठी दाखल होताना किंतु मनात ठेऊन या सेंटरमध्ये आलेले बहुतांशी रूग्ण जाताना मात्र, कोरोनामुक्त होऊन उत्तम सुविधांबद्दल पालिका यंत्रणेचे आभार मानतच या सेंटरला निरोप देत असल्याचे चित्र महापालिकेच्या निकमार 'कोविड केअर सेंटर' मध्ये पाहण्यास मिळाले. 

पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाच काही खासगी हॉस्पिटलने आपले कोविड-१९ रूग्णांसाठीचे दरपत्रकच तयार केले.  कमीत कमी ३० हजार व जास्तीत जास्त १ लाख रुपए डिपॉझिट भरल्याशिवाय या ठिकाणी प्रवेशच नसल्याचे चित्र शहरात आहे. परंतु, याच वेळी समाजातील तळागाळातील व्यक्तीलाही कोरोना संसर्ग झाल्यास, उच्चप्रतीची सेवा मिळावी यासाठी पुणे महापालिकेचे ३२ ‘कोविड केअर सेंटर’ शहरात कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी लक्षणे नसलेले अथवा सौम्य लक्षणे असलेले साधारणत: साडेचार हजार रूग्ण सध्या उपचार घेत आहेत. यापैकी निकमार सेंटरमध्ये सद्यस्थितीला ६६५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण उपचारासाठी दाखल आहेत.     निकमार सेंटरची एकूण क्षमता ९६९ खाटांची असून, या ठिकाणी काही इमारतीमध्ये प्रत्येक खोलीत एक तर काही ठिकाणी दोन रूग्णांची सोय करण्यात आली आहे. स्वतंत्र बाथरूड, शौचालय, दोन खाटांमध्ये सुरक्षित अंतर असलेल्या या खोल्या रूग्णांना हॉटेलची आठवण करून देणाऱ्या आहेत. एकाच कुटुंबातील पॉझिटिव्ह रूग्ण असतील तर, ते या ठिकाणी शेजार-शेजारच्या खोल्यांमध्ये दहा दिवस उपचारसाठी दाखल करून घेण्यात येतात. सकाळचा चहा, नाष्टा, संध्याकाळी चहा, दोन वेळचे जेवण देण्यासाठी येथे स्वतंत्र किचन व्यवस्थाच करण्यात आली आहे. परिणामी वेळेवर जेवण येथील सर्व रूग्णांना मिळत असल्याने बहुतांशी रूग्ण या सेवेबाबत समाधानी असल्याचे चित्र ह्यलोकमतह्णच्या पाहणी दिसून आले. आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत आणि उपचारासाठी दाखल झालो असल्याची भावना येथे कुठल्याही रूग्णामध्ये पाहण्यास मिळाली नाही. सकाळी वॉकिंगसाठी खोली बाहेर पडणे, सुरक्षित अंतर ठेऊन सायंकाळी खेळ खेळणे, इमारतीच्या पॅसेजमध्ये खुर्चा टाकून एकमेकांशी गप्पा मारणे, निकमारच्या पॅसेजमध्ये फेरफटका मारणे आदी गोष्टींमुळ येथे कोणी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहे किंवा कुठलेही भीतीचे वातावरण दिसून येत नाही. 

२४ तास येथे डॉक्टरांची एक टिम येथे कार्यरत असून, अन्य आजार असलेल्या अथवा वयस्कर रूग्णांस काही त्रास झाल्यास त्याला अन्यत्र म्हणजेच डेडिकेटेड कोविड सेंटरला हलविण्याची यंत्रणाही येथे उपलब्ध आहे. येथील पॉझिटिव्ह रूग्णांना त्यांच्या लक्षणानुसार औषधोपचार दिले जात असून, शासनाने निर्देशित केलेल्या एचसीक्यु औषधांची मात्राही त्यांना याठिकाणी दिली जात आहे. १० दिवसांच्या उपचारानंतर हे रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी जाताना महापालिकेच्या सुविधांबाबत समाधान व्यक्त करून सरकारी रूग्णालय हेही खाजगी रूग्णालयांच्या सेवेपेक्षा कमी नसल्याचा विश्वास मनात नक्की करून जात आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाdoctorडॉक्टर