शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : अनेक रुग्ण ठणठणीत, तुम्हीच काळजी घ्या..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 22:27 IST

अमेरिका, इटली या देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना बाधित रुग्ण तसेच मृतांचा आकडा नियंत्रणात

ठळक मुद्देएकुण कोरोनाबाधित रुग्णांपैकी २७ रुग्ण बरे होऊन परतले घरी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाचा संसर्ग होऊ न देण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक

पुणे : शहरातील विविध रुग्णालयात दाखल असलेल्या २०२ रुग्णांपैकी केवळ सहा रुग्ण अत्यवस्थ आहेत. तर एकुण कोरोनाबाधित रुग्णांपैकी २७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच सध्या उपचार घेत असलेले अनेक रुग्णही ठणठणीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाचा संसर्ग होऊ न देण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे.अमेरिका, इटली या देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना बाधित रुग्ण तसेच मृतांचा आकडा नियंत्रणात असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हटले आहे. पुण्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत आढळून येत असलेल्या रुग्णांची संख्याही कमी आहे. शासनाने योग्यवेळी घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे हे शक्य झाले आहे. सध्या पुणे शहरामध्ये नायडू व अन्य रुग्णालयांमध्ये १५१ तर ससून रुग्णालयात ५१ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी केवळ ६ रुग्ण अत्यवस्थ असून ५ रुग्ण ससून रग्णालयात व्हेंटिलेटरवर आहेत. तर १० रुग्णांना श्वसनाला त्रास होत असल्याने आॅक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत अत्यवस्थ असलेल्या रुग्णांपैकी मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये यापुर्वी कोणता ना कोणाता आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अधिक आहे. त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने कोरोनाशी त्यांचा लढा अयशस्वी ठरला. पण प्रतिकारशक्ती चांगले असलेले, कोणताही आजार नसलेले ज्येष्ठ, तरूण-तरूणी, लहान मुले कोरोनाला हरवत आहेत.पुणे शहरात पहिले कोरोनाबाधित दोन रुग्ण दि. ९ मार्च रोजी आढळून आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील दोघांना लागण झाली. ते सर्वजण १४ दिवसांनी सुखरुपपणे घरी परतले. त्यानंतर दाखल झालेले रुग्ण १४ दिवसांच्या टप्प्यानंतर घरी परतत आहेत. एका खासगी रुग्णालयात बरेच दिवस व्हेंटिलेटरवर असलेली महिलाही उपचारानंतर घरी गेली. आतापर्यंत नायडू रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालयांतून एकुण २७ रुग्ण कोरोनाला हरवून घरी गेले आहेत. तरीही त्यांना दक्षता म्हणून पुढील १४ दिवस होम क्वारंटाईनच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सध्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर काही रुग्णांना अत्यंत सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. काही रुग्णांमधील लक्षणे तीव्र असली तरी त्यांची तब्बेत ठीक आहे. त्यांच्यावर लक्षणांनुसार औषधोपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत आहे, असे त्यांच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनी सांगितले.---------------सध्या नायडू रुग्णालयामध्ये उपचार घेतलेल्या एकुण रुग्णांमध्ये १० ते १२ कुटूंबातील लोक आहेत. प्रत्येक कुटुंबातील ३ ते पाच रुग्ण आहेत. तसेच त्यांच्या संपर्कातील काही शेजारील लोकांचाही समावेश आहे. त्यामुळे रुग्णांचे क्लस्टर तयार झाले आहे, असे आरोग्य अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी काळजी न घेतल्यास पहिला संसर्ग आपल्या कुटंूबातील सदस्यांना होण्याचा धोका सर्वाधिक असल्याचेही अधिकाºयांनी सांगितले.------------ससून रुग्णालयातील स्थिती -एकुण रुग्ण - ७६सध्या रुग्ण - ५१व्हेंटिलेटरवर - ५आॅक्सिजनची गरज - १०एकुण मृत्यु - २५--------------------नायडू व अन्य रुग्णालयातील स्थिती -एकुण रुग्ण - २०२सध्या उपचार सुरू - १५१व्हेंटिलेटर - १घरी परतले - २७एकुण मृत्यु - ८---------------------पुण्यातील रुग्णांची एकुण स्थिती -एकुण रुग्ण - २७८एकुण अत्यवस्थ - ६घरी परतले - २७एकुण मृत्यू - ३३---------------- 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य