Corona Virus : पुणेकरांची चिंता वाढली! जिल्ह्यात गुरुवारी तब्बल १२९ जणांना ओमायक्रॉनची लागण, अशी आहे शहराची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 09:08 PM2022-01-08T21:08:29+5:302022-01-08T21:12:05+5:30

आजपर्यंत पुणे शहरात २०१, पिंपरी चिंचवडमध्ये ५३, तर पुणे ग्रामीणमध्ये ३२ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील १००९ रुग्णांपैकी ४३९ रुग्णांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

Corona Virus As many as 129 found infected with Omicron variant in Pune district on Thursday | Corona Virus : पुणेकरांची चिंता वाढली! जिल्ह्यात गुरुवारी तब्बल १२९ जणांना ओमायक्रॉनची लागण, अशी आहे शहराची स्थिती

Corona Virus : पुणेकरांची चिंता वाढली! जिल्ह्यात गुरुवारी तब्बल १२९ जणांना ओमायक्रॉनची लागण, अशी आहे शहराची स्थिती

Next

पुणे : शनिवारी राज्यात १३३ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यांपैकी १३० रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने आणि ३ रुग्ण गुजरात राज्याने रिपोर्ट केले आहेत. यांपैकी पुणे शहरात ११८, पिंपरी चिंचवडमध्ये ८ आणि पुणे ग्रामीणमध्ये ३ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांचा आकडा गुरुवारी १२९ वर पोहोचला आहे.

आजपर्यंत पुणे शहरात २०१, पिंपरी चिंचवडमध्ये ५३, तर पुणे ग्रामीणमध्ये ३२ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील १००९ रुग्णांपैकी ४३९ रुग्णांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेदेखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ३०७६ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यांपैकी ९७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
 
Web Title: Corona Virus As many as 129 found infected with Omicron variant in Pune district on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.