शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

Corona Virus : आता पुण्याला देशातील पहिले कोरोनामुक्त शहर बनवू या : अजित पवार यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 9:01 PM

लोकांनी काळजी न घेतल्याने बेड मिळणेही कठीण झाले होते. पण आता परिस्थिती सुधारत आहेत..

ठळक मुद्देस्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयामध्ये ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या अभियान उद्घाटन

पुणे : राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुण्यात आढळला. त्यानंतर देशातील सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात झाले. त्यामुळे आतापर्यंत सर्व सण साधेपणाने साजरे केले. लोकांनी काळजी न घेतल्याने बेड मिळणेही कठीण झाले होते. पण आता परिस्थिती सुधारत आहेत. तरीही पुरेशी दक्षता घेऊन पुण्याला देशातील पहिले कोरोनामुक्त शहर करूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यासाठी शासन निधीसह सर्वप्रकारची मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयामध्ये ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या अभियानाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, संचालक शंकर पवार आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. दुसरी लाट डिसेंबर -जानेवारीमध्ये आली तरी आपण पुर्ण तयारी केली आहे. सध्या बेड शिल्लक आहेत. पण जनतेने काळजी घेतली तरच यश मिळेल. मास्कच्या कारवाईत जिल्ह्यात साडे बारा कोटी रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. असे दुर्लक्ष करू  नका. त्याची आधी जबरदस्त किंमत मोजावी लागली आहे.मोहोळ यांनी आता जनजागृतीवर अधिक भर देणे गरजेचे असल्याचे सांगितले. जगताप यांनी कोरोना जनजागृतीसाठी पीएमपी तत्पर असल्याचे सांगत आपली भुमिका स्पष्ट केली.-------------पीएमपी बसमध्ये जनजागृती संदेशअभियानांतर्गत ५०० पीएमपी बस व स्थानकांवर कोरोनाविषयी जनजागृती करणारे संदेश लावले जाणार आहेत. त्याचे अनावर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी पवार यांनी पीएमपीच्या काही बसची पाहणी करून अभियानाची सुरूवात केली. यावेळी कर्मचाºयांना कोरोना जगजागृती शपथही देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवार