शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव; प्राथमिक शिक्षकांना एकावेळी दोन ठिकाणी काम करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 15:00 IST

प्रत्येक खात्याचे आदेश वेगवेगळे आल्याने शिक्षकांचा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 

ठळक मुद्देएकावेळी एकाच ठिकाणी काम करण्याचे आदेश देण्यात यावेत असे निवेदन

लोणी काळभोर : अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे प्राथमिक शिक्षकांना एकाच वेळी दोन ठिकाणी काम करण्याचे आदेश प्राप्त झाले असल्याने शिक्षक द्विधा मनस्थितीत सापडले आहे. हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाने एकावेळी एकाच ठिकाणी काम करण्याचे आदेश देण्यात यावेत असे निवेदन हवेली तहसीलदार व पंचायत समिती हवेलीचे गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे. 

 याबाबत हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश कुंजीर म्हणाले, शिक्षकांना कोविड प्रतिबंधासाठी गाव सर्वेक्षण, रेशन धान्य वाटप, कोविड सेंटर तसेच ऑनलाईन शिक्षण आदी अनेक कामे करण्याचे आदेश देेेण्यात आले आहेत. यामुळे एकाच वेळी ही सर्व कामे कशी करावयाची ? हे प्रश्नचिन्ह त्यांना सतावत आहे. वास्तविक पहाता तालुक्यांत अनेक शिक्षण संस्था व महाविद्यालये आहेत. येथील कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करून नियमित व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांवरच अतिरिक्त कामाची कु-हाड का ? 

 जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिल व पंचायत समिती व आरोग्य कार्यालयांच्या वतीने हा आदेश काढण्यात आले आहेत. परंतू, या सर्व कार्यालयातील अधिकारी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने हा प्रकार घडला आहे. प्रत्येक खात्याचे आदेश वेगवेगळे आल्याने शिक्षकांचा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 

कोरोना महामारीत काम करण्यास ते तयार आहेत. पण एकावेळी एका ठिकाणी काम करण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच जे काम आहे त्याचे योग्य प्रशिक्षण व सर्व संरक्षण साहित्य मिळावे व सर्वाना समान काम दयावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

 काही प्राथमिक शिक्षकांना एकाच वेळी दोन ठिकाणी काम करण्याचे आदेश देण्यात आलेची माहिती दोन दिवसांपूर्वी समजली असून ही बाब योग्य नाही. गरजेप्रमाणे पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून आवश्यक तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येते. दिलेले आदेशांची तपासणी करून दुबार नावे होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असे संबंधित अधिकारी यांना सांगण्यात आले आहे.   सुनील कोळी - तहसिलदार, हवेली तालुका

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरTeacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस