शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : 'जम्बो' तुन थेट रुग्णानेच खुशालीचा व्हिडिओ कॉल केला ; कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 11:36 IST

जम्बो रुग्णालयामधून २३ रुग्णांनी साधला नातेवाईकांशी संवाद

ठळक मुद्दे दिवसभरात २० रुग्ण बरे होऊन गेले घरी

पुणे :  कोरोनाग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या  ‘जम्बो कोविड सेंटर’मधून बुधवारी दिवसभरात २३ रुग्णांनी व्हिडीओ कॉलिंग सुविधेद्वारे आपल्या नातेवाईकांसोबत संवाद साधला. तर, दिवसभरात २० रुग्ण बरे होऊन घरी परतले. जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्या दिवसापासून सुरु झालेल्या असुविधेमध्ये पालिकेने रुग्णालयाचा ताबा घेतल्यापासून सुधारणा दिसू लागल्या आहेत. याठिकाणी नेमण्यात आलेल्या मेडिब्रो एजन्सीद्वारे मागील काही दिवसांपासून काम सुरु आहे. पालिकेनेही त्यांच्याकडील मनुष्यबळ याठिकाणी तैनात केले आहे. यासोबतच देखरेखीसाठी आणि कामकाजातील सुधारणेसाठी सहा अधिका-यांची समन्वय समितीही गठीत करण्यात आली आहे. रुग्णांना दिवसामधून पाच वेळा जेवण दिले जात असून नातेवाईकांना रुग्णांची माहिती मिळावी याकरिता मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. यासोबतच रुग्णांना थेट नातेवाईकांशी बोलता यावे आणि त्यांची सद्यस्थिती कळावी याकरिता व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात व्हिडीओ कॉलिंगद्वारे 23 रुग्णांनी आपल्या नातेवाईकांशी संवाद साधला. यासोबतच उपचार घेऊन बरे झालेल्या २० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. याठिकाणी पालिका आणि मेडिकल एजन्सीचे एकत्रित ६० डॉक्टर आणि १५०  वैद्यकीय कर्मचारी काम करीत आहेत.  याठिकाणी २४  तास डॉक्टरांच्या टीम कार्यरत असून रुग्णांना कसलाही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जात असल्याचे पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले. रुग्णांना पाचवेळा जेवण रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी मागील आठवड्याभरात आल्या. त्यामुळे पालिकेने आता जम्बो रुग्णालयामध्ये दिवसामधून पाच वेळा जेवण देण्यास सुरुवात केली आहे. हे जेवण दर्जेदार असावे आणि त्यामधून पोषणतत्व मिळावीत याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. जम्बोच्या प्रवेशद्वारावर नेमण्यात आलेले बाऊन्सर हटविण्यात आले आहेत. नातेवाईकां ना दिवसातून तीन वेळा रुग्णांची माहिती दिली जात असल्याने तक्रारी आणि वादाचे प्रसंग कमी झाले आहेत.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलFamilyपरिवार