शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
2
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
3
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
4
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
5
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
6
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
7
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
8
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
9
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
10
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
11
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
12
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
13
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
14
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
15
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
16
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
17
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
18
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
19
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
20
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे जिल्ह्यात सोमवारी तब्बल १३५६ कोरोनाबाधितांची वाढ; एकूण रुग्णसंख्या २९ हजार ४०३ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 12:12 IST

पुणे शहरात सोमवारी कोरोनाबधितांची संख्या ८६१ ने वाढली असून, १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १७ हजार ३२९ बाधित रुग्ण बरे होवून गेले आहेत घरी४९२ रुग्ण गंभीर : २१जणांचा मृत्यू

पुणे : पुणे जिल्हयात २९ हजार ४०३ बाधित रुग्ण असून १७ हजार ३२९ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात ११ हजार १९९  व अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत एकूण ८७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४९२ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५८.९४ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण ३.९८ टक्के इतके आहे. सातारा जिल्हयातील १ हजार ३३४  बाधित रुग्ण असून ७९१ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या ४८८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  पुणे शहरात सोमवारी कोरोनाबधितांची संख्या ८६१ ने वाढली असून, १५ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २२ हजार ३८१ झाला असला तरी, आतापर्यंत १३ हजार ७३९ कोरोनाबधित कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.         पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही ७ हजार ९१२  इतकी आहे. शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ६०४ तर खासगी रुग्णालयांमध्ये २४२ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३६८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.             सोमवारी १५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७३० इतकी झाली आहे.          दिवसभरात एकूण ६३० रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ४३० रुग्ण, ससूनमधील २२ तर खासगी रुग्णालयांमधील १७८   रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या पुणे शहरात १३ हजार ७३९ झाली आहे. -------------दिवसभरात विविध केंद्रांवर आज एकूण ४ हजार २८४ नागरिकांची स्वब घेण्यात आले असून, आतापर्यंत एकूण १ लाख ३७ हजार ३६४ जणांची तपासणी करण्यात आली आहे. आज पासून शहरात रॅपिड टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली असून, आज २६४ जणांची तपासणी करण्यात आली......

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर राम