शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

Corona virus : पुणे शहरात १०२ पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ : जिल्ह्यात ४ हजार १७७ कोरोनाबाधित रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 12:11 IST

शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आजपर्यंत ३ हजार ५९८

ठळक मुद्देतब्बल १ हजार ८०० जण कोरोनामुक्तआजपर्यंत शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १९९ जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 69 रुग्ण बरे होऊन घरी परतले जिल्ह्यात 159 नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची वाढ ; 5 मृत्यू 

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून दोनशेच्या जवळपास वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी निम्म्याने कमी होऊन १०२ इतकी झाली आहे. तर आज आणखी ४९ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आजपर्यंत ३ हजार ५९८ इतकी झाली असली तरी, यापैकी तब्बल १ हजार ८०० जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. यामुळे शहरातील अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ही सद्यस्थितीला १ हजार ५९९ इतकीच आहे.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंटेन्मेंट भागातील कोरोना संशयित नागरिकांची तपासणीचे प्रमाण वाढल्यापासून कोरोना रूग्णांची वाढ दिसून येत आहे. मात्र, तपासणीच्या तुलनेत मात्र हे प्रमाण ९ टक्केच असल्याचे गेल्या दहा दिवसांपासून दिसून येत आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात १ हजार ४१९ जणांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १०२ जणांचे पॉझिटिव्ह अहवाल आले असून, यातील ४५ जण खासगी हॉस्पिटलमध्ये, ३८ जण नायडू हॉस्पिटल व पालिकेने उभारलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये तर १९ जण ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. आज पाच कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, यापैकी चार जण हे खासगी हॉस्पिटलमधील तर एक जण ससून हॉस्पिटलमधील आहेत. शहरातील एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी १४८ रूग्णांची प्रकृती गंभीूर असून, ५० जण व्हेंटिलेटरवर आहेत.  आजपर्यंत शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १९९ झाली असली तरी, त्यांना अन्य आजाराने ग्रासलेले होते.

..........................

जिल्ह्यात 159 नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची वाढ ; 5 मृत्यू पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवार (दि.18) रोजी एका दिवसांत 159 नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले.तर 5 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला. तर सोमवारी एका दिवसांत 55 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले. आता पर्यंत जिल्ह्यात 4 हजार 177 रुग्ण झाले असून, आतापर्यंत 2 हजार 69 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी 1 हजार 232 संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी 159 रूग्णांचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला, यामुळे आतापर्यंत एकूण 211 मृत्यू झाले आहेत. यामुळे सध्या जिल्ह्यात 1 हजार 897 ॲक्टीव रुग्ण आहेत. तर 166 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ----- एकूण बाधित रूग्ण : 4177पुणे शहर : 3628पिंपरी चिंचवड : 222कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 327मृत्यु : 211घरी सोडलेले : 2069

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरNavalkishor Ramनवलकिशोर राम