शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात गुरुवारी १००६ कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या २५ हजार १७४

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 00:37 IST

दिवसभरात कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्यांची संख्या ५८१

ठळक मुद्देविविध रुग्णालयात दाखल असलेले ४०२ रुग्ण अत्यवस्थ, १६ जणांचा मृत्यू

४०२ रुग्ण अत्यवस्थ, १६ जणांचा मृत्यूपुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत गुरूवारी १ हजार ६ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २५ हजार १७४ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ५८१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४०२ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ८ हजार ८०९ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. गुरूवारी रात्री दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १००६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १२, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ५३९ तर खासगी रुग्णालयांमध्ये ४५५ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४०२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ७५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३२७ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात गुरूवारी १६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७८६ झाली आहे. दिवसभरात एकूण ५८१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ३८० रुग्ण, ससूनमधील २३ तर  खासगी रुग्णालयांमधील १८७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १५ हजार ५७९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ८ हजार ८०९ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ९२९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ५० हजार ६२८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच नव्याने सुरू करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे ७५५ लोकांची तपासणी करण्यात आली असून या किटद्वारे एकूण ४ हजार ६८४ जणांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरDeathमृत्यू