शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : कोरोनामुळे कर्फ्यू लावलेल्या भागात अडचणीत आहात का? तर मग इथे फोन करा, मेसेज पाठवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 16:40 IST

दुध, कोरडा शिधा, किंवा औषधे वगैरे आवश्यक गोष्टींची यांची तात्काळ मदत केली जाणार

ठळक मुद्देआवश्यक गोष्टींची मदत : कर्फ्यू लावलेल्या भागासाठी प्रशासनाचे आवाहनमोमीनपुरा, कागदीपुरा, तक्क्या, टिंबर मार्केट, लोहियानगर, या मोठ्या परिसराची फार अडचण

पुणे: कोरोनामुळे कर्फ्यू लावलेल्या भागातील वृद्ध, निराधार, परित्यक्ता महिला यांची अडचण होऊ नये यासाठी तहसील कार्यालयाने हेल्पलाईन सुरू केली आहे. ०२०-२४४७२८५०या दुरध्वनीवर संपर्क साधला किंवा ९८५०७१९५९६या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवला तर दुध, कोरडा शिधा, किंवा औषधे वगैरे आवश्यक गोष्टींची यांची तात्काळ मदत केली जाणार आहे.कर्फ्यू लावण्यात आलेल्या पुण्याच्या मध्यभागातील पेठा तसेच मोमीनपुरा, कागदीपुरा, तक्क्या, टिंबर मार्केट, लोहियानगर, या मोठ्या परिसराची फार अडचण झाली आहे. निराधार तसेच वृद्ध, परित्यक्ता महिला, घरकाम किंवा कष्टकरी वर्गाची संख्या या परिसरात बरीच आहे. गवरी आळी येथील भाजी मंडई, किराणा भुसार मालाची दुकाने काही दुध केंद्र ही बंद झाली आहेत. त्यामुळे या दैनंदिन गोष्टींचा या भागातील पुरवठा थांबला आहे. पैसे आहेत असे लोक साठा करून ठेवल्याने व्यवस्थित आहेत, तर पैसेही नाही व कसली मदतही होत नाही यामुळे गरीब घरातील चुल पेटणेही अवघड झाले आहे.कोरोना आपत्ती निवारण कक्षाच्या प्रमुख तहसीलदार त्रुप्ती कोलते यांनी सांगितले की अशा नागरिकांनी वर दिलेल्या क्रमाकांवर संपर्क साधावा. त्यांना लगेच मदत पोहचवण्यात येईल. सरकारी कर्मचारी त्यांच्या घराजवळ येईल. परिसरातील सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागातील अशा नागरिकांची यादी करून पाठवली तरी त्यांच्यापर्यंत मदत देता येईल. अशा कार्यकर्त्यांनीही संपर्क साधावा. त्यामुळे एकत्रित मदत करणेही शक्य होईल.कोलते म्हणाल्या, या भागातून कोरोना बाधीत रूग्ण सापडत असल्याने संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे. कोणालाही कोणत्याही कारणाशिवाय रस्त्यावर यायला मनाई आहे. मंडई व दुकानेही बंद आहेत. त्यामुळे या भागातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यातून काही कुटुंब व निराधार नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी ही हेल्पलाईन आहे. फोनवर संपर्क साधणे शक्य होत नसल्यास मामलेदार कचेरी, खडकमाळ आळी,शिवाजी रस्ता येथील.आपत्ती निवारण कक्षात एकट्याने व मास्क घालून येऊन अडचण सांगितली तरी चालेल. कक्ष व त्यातील दुरध्वनी सेवा २४ तास कार्यरत आहे अशी माहिती कोलते यांनी दिली.

लक्षणे दिसली की तपासून घ्याया भागात दाट लोकवस्ती आहे. त्यामुळेच संसर्गाची भीती आहे. नागरिक वाळीत टाकले जाण्याच्या भीतीतून ताप, सर्दी खोकला हे आजार अंगावरच काढत आहेत. तसे न करता तत्काळ सरकारी किंवा खासगी डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यातूनच कोरोना चा संसर्ग टाळता येणे शक्य आहे.तृप्ती कोलते,तहसीलदार, पुणे शहर.

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारीPoliceपोलिस