शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे रेल्वे स्थानकावर ४०० जणांचे होणार विलगीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 11:24 IST

कोचिंग डेपोत ५० डब्यांमध्ये कक्षनिर्मिती करणार

ठळक मुद्देविलगीकरण कक्ष तयार करताना डब्यांमध्ये अनेक बदल केले जाणारडब्यांमध्ये कक्ष निर्मितीचे काम एक-दोन दिवसांत सुरू होणार स्वच्छतागृह, बाथरूमची स्वतंत्र व्यवस्थाप्रामुख्याने स्लीपर कोचच्या डब्यांचा वापर

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने भारतीय रेल्वेनेहीरेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष निर्माण केले जात आहेत. पुणे विभागात घोरपडी येथील कोचिंग डेपोमध्ये सुमारे ५० डब्यांमध्ये कक्ष निर्मितीचे काम एक-दोन दिवसांत सुरू होणार असून हे डबे पुणे रेल्वे स्थानकावर उभे केले जाणार आहेत. त्यामध्ये जवळपास ४०० जणांच्या विलगीकरणाची व्यवस्था होऊ शकेल.जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्राथमिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. सर्व शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालये तसेच अन्य आस्थापनांमध्ये विलगीकरण कक्ष निर्माण केले जात आहेत. त्यामध्ये रेल्वेनेही पुढाकार घेऊन रेल्वे डब्यांमध्ये कक्ष निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडेही सुमारे ५० विलगीकरण कक्ष निर्माण करण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. घोरपडी येथे रेल्वेचा कोचिंग डेपो आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या डब्यांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करून कक्ष तयार केले जाणार आहेत. त्याबाबत यांत्रिक विभागाला सूचना दिल्या आहेत. या कक्षांत सुमारे ४०० रुग्णांची व्यवस्था होऊ शकते.विलगीकरण कक्ष तयार करताना डब्यांमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. प्रामुख्याने स्लीपर कोचच्या डब्यांचा वापर केला जाईल. डॉक्टर व परिचारिकांसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. स्वच्छतागृह, बाथरूमची स्वतंत्र व्यवस्था असेल. ........रेल्वे डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्याच्या सूचना मध्य रेल्वेकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार घोरपडी येथील कोचिंग डेपोमध्ये पुढील एक-दोन दिवसांत हे काम सुरू केले जाणार आहे.- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग, मध्य रेल्वे..............रेल्वे डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्याचा निर्णय योग्य आहे; पण त्याचबरोबर रेल्वेने आपली रुग्णालयेही सुसज्ज करायला हवीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिथेही अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल