शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : इंदापूर शहरात पहिला कोरोना रुग्ण आढळला; ७८ वर्षीय व्यक्तीला संसर्ग  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 15:17 IST

तीन महिन्यापासून प्रशासनाने घेतलेल्या काळजीमुळे शहर कोरोनामुक्त होते...

ठळक मुद्देसंपूर्ण भाग आरोग्य विभागाकडून सील

इंदापूर : इंदापूर शहरात मागील तीन महिन्यापासून प्रशासनाने घेतलेल्या काळजीमुळे शहर कोरोनामुक्त होते. मात्र इंदापुर येथील ७८ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण दोन महिन्यांपासुन सोलापुरमध्ये वास्तव्यास होता.तो इंदापूर येथील रहिवाशी असून येथे ३१ मे रोजी मुक्काम करुन पुण्याला रुबी हॉल येथे उपचारासाठी दाखल केले होते.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर शहरातील मूळ रहिवासी असणारे व्यक्ती गेले दोन महिन्यांहून अधिक काळ सोलापूर येथे आपल्या लेकीकडे राहावयास होती. त्यांना शारीरिक इतर त्रास जाणवू लागल्याने ( दि. ३१ मे ) रोजी ती व्यक्ती इंदापूर शहरातील दर्गा मस्जिद चौक या ठिकाणी त्यांच्या कुटुंबांमध्ये दाखल झाली. त्यानंतर ( दि.१ जून )  रोजी सदरच्या व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील रुबी हॉस्पिटलला रुग्णवाहिकेने नेण्यात आले. त्यावेळी तेथे त्यांची पहिली कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने ( दि.४ जून )  रोजी दुसरी कोरोना चाचणी घेतल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रशासनाने दिली.या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच इंदापूर प्रशासनाकडून दर्गा मस्जिद चौक, नेहरू चौक, टेंभुर्णी नाका असा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, तहसिलदार सोनाली मेटकरी आदींनी शनिवारी ( दि. ६ जून ) भागात भेट देवून पाहणी केली. नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन केले आहे.मात्र, या कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या घरातील तीन व्यक्ती, रुग्णवाहिका चालक व रुग्णाचा पुतण्या आणि रुग्णाला आपल्या रिक्षाने सोडणाऱ्या रिक्षा चालकासह संपर्कात आलेल्या एकूण एकोणीस व्यक्तींना इंदापूर शहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृह मधील ( सीसीसी) मध्ये विलगीकरण करण्यात आले आहेत. त्यांचे स्वॅब टेस्ट ( घशाचे नमुने ) घेण्यात येत आहेत,अशी माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी  व वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली._____________

नागरिकांनी घाबरू नये : राज्यमंत्री दत्तात्रय भरणेइंदापूर शहरातील दर्गा मस्जिद चौकात कोविड १९ टीम व प्रशासनाने भेट देवून, शनिवारी सकाळी पाहणी केली. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही भेट देवून, नागरिकांना अहवान केले की, नागरिकांनी घाबरून जावू नये, बाहेरून येणाऱ्या नागरिकांची प्रशासनाला तत्काळ माहिती द्यावी, तसेच नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची अधिक काळजी घ्यावी असेही अवाहन यावेळी केले.

टॅग्स :IndapurइंदापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस