शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus :पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील आश्रमात कोरोनाचा शिरकाव; १९ लहान मुलांना लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 17:58 IST

पुरंदरमधील आंबळे येथे सार्थक नावाने आश्रम आहे. यामध्ये सर्व मुले ही निराधार, भीक मागणारी, तर काही मुले रेड लाईट एरियामधील आहेत.

ठळक मुद्देसात ते आठ वयोगट :  खळद येथील आनंदी कोविड सेंटरमध्ये केले दाखल

सासवड:  पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील निराधार लहान मुलांसाठी चालविण्यात येत असलेल्या सार्थक अनाथ आश्रमात कोरोनाने शिरकाव केला आहे. आश्रमातील तब्बल १९ मुले कोरोनाबाधित झाली आहेत. ही सर्व मुले ८ ते ९ या वयोगटातील आहेत. या सर्वाना सासवड-जेजुरी रस्त्यावरील आनंदी कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पालक आणि विद्यार्थी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुरंदरमधील आंबळे येथे सार्थक नावाने आश्रम आहे. यामध्ये सर्व मुले ही निराधार, भिक मागणारी, तर काही मुले रेड लाईट एरिया मधील आहेत. आश्रमात एकूण ७९ मुले असून सर्व मुले ८ ते ९ या वयोगटातील आहेत. मुख्य व्यवस्थापक डॉ. अनिल कुडीया आणि मदतनीस दिपाली पाटील यांच्यासह ९ ते १० जणांचा एकूण स्टाफ आहे. काही दिवसांपूर्वी व्यवस्थापक डॉ. अनिल कुडीया आणि त्यानंतर दिपाली पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर काही दिवसांत आणखी ४ मुलींना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आंबळे येथील ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने आश्रमातील मुलांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये एकाच वेळी तब्बल १९ मुले कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या सर्व मुलांना सासवड - जेजुरी रस्त्यावरील ग्रामीण संस्थेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या आनंदी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पुरंदरचे आमदार संजय जगताप, यांनी तातडीने कोविड सेंटरला भेट देवून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तेथील व्यवस्थापक अनिल उरवणे, मुन्ना शिंदे, डॉ. सुमित काकडे, सागर मोकाशी, विश्वजित आनंदे यांच्याशी चर्चा करून मुलांना योग्य ते उपचार करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

गटविकास अधिकारी अमर माने यांनी वसतिगृहाची माहिती घेतली असून संपूर्ण इमारतीचे निर्जंतूकीकरण करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे आश्रमातील संपूर्ण मुलांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्या प्रमाणे पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती माळशिरस केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. विवेक आबनावे यांनी दिली आहे..............आश्रमातील सर्व मुलांना आनंदी कोविड सेंटर मध्ये दाखल केल्यानंतर आश्रमातील इतर मुलांचे त्याच ठिकाणी विलगीकरण करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने दररोज त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येत आहे. - राजश्री थोरात(सरपंच), सचिन दरेकर (उपसरपंच), आंबळे.

टॅग्स :PurandarपुरंदरPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल