शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

Corona virus : बारामतीत जमावबंदीचा भंग केल्याने आठ जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 17:21 IST

तीन गुन्हे दाखल, शहराच्या चारही बाजुने नाकाबंदी 

ठळक मुद्देदवाखाने ,मेडिकल, किराणा दुकान, फळ मार्केट, भाजी मार्केट इतर अत्यावश्यक सुविधा चालू

बारामती : शहरात शासनाच्या आदेशानुसार कलम १४४ अन्वये संचारबंदी लागु करण्यात आली आहे.त्यानंतर देखील शहरातील नागरीकांचा वावर वाढला आहे. शेवटी पोलीस प्रशासनाने विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोघा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.शहराच्या चारही बाजुने नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील नागरिकांना सूचित करण्यात येत आहे. फौजदारी दंड संहिता कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू असलेने कोणीही विनाकारण रस्त्यावर दुचाकीवरून फिरू नये, अगर चौकांमध्ये गर्दी करू नये. रस्त्यावर गर्दी आहे की नाही हे पाहण्याकरता लोक रस्त्यावर येत आहेत. नागरिकांच्या सुविधाकरता दवाखाने ,मेडिकल, किराणा दुकान, फळ मार्केट, भाजी मार्केट इतर अत्यावश्यक सुविधा चालू ठेवण्यात आलेले आहेत. परंतु ,कोणतेही कारण नसताना लोक रस्त्यावर फिरताना दिसून येत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येत आहे. जर लोकांनी सहकार्य केले नाही तर संचार बंदीचे उल्लंघन म्हणून भारतीय दंड संहिता कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांमधील कलम पाच अन्वये सार्वजनिक ठिकाणी विनाकारण आल्यामुळे अमन अरुण पाटोळे (वय २६)  तानाजी आण्णा पवार (वय ३२ ,दोघे रा. शेंडे वस्ती ,बारामती) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विनीत कुमार (वय १९,रा.कृष्णेरी,तांदुळवाडी),विलास र. मोहन (वय २०,रा. तांदुळवाडी),कुमार चिंनप्पा (वय १९,रा. तांदुळवाडी),वेंकटेश वेळे (वय १९,रा.तांदुळवाडी), वासुदेव कमळे (वय १९) हे सर्वजण एकाच ठिकाणी पाच जण मिळुन आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सचिन पोपट ढमाळ (वय ३२, रा.कसबा,बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे शिरगांवकर यांनी सांगितले. तसेच त्या नागरिकांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी (दि २३) संचारबंदी लागु केल्यानंतर देखील रस्त्यावर विनाकारण वावरणाºया नागरिकांना पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे.शहराच्या चारही बाजुने नाकाबंदी करण्यात आली आहे.शहरात प्रवेश करणारे,शहराबाहेर जाणा?्यांची चौकशी करण्यात येत आहे. आवश्यक महत्वाचे कारण असल्यानंतरच पोलीस संबंधिताना बाहेर जाण्यास,प्रवेश करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

टॅग्स :Baramatiबारामतीgudhi padwaगुढीपाडवाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस