शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

Corona Virus: पुणे जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 5:26 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड परिसरातील तीन शाळा पूढील दोन-तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत.

पुणे : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे पुण्यात पाच संशयित रूग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी रात्री केली.दुबईहून आलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्यावर पुणे पालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. या दाम्पत्याची मुलगी, सहप्रवासी आणि त्यांना मुंबईहून पुण्याला घेऊन आलेल्या कॅब चालकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या पाचवर पोचली आहे.

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात राहणारे हे दाम्पत्य जगभ्रमंतीवर गेले होते. त्यांच्यासोबत आणखी ४० सह प्रवासी होते. हे दाम्पत्य दुबईहून विमानाने १ मार्च रोजी मुंबईला आले. तेथून कॅबमधून ते पुण्याला आले. यातील पुरुषाला ताप आल्यानंतर त्रास जाणवू लागल्यावर केलेल्या तपासणीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची ओळख पटवून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांची मुलगी, मुलगा आणि मुंबईहून त्यांना घेऊन आलेल्या कॅब चालकाची तपासणी करण्यात आली. या अहवालामध्ये मुलगी आणि चालकामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. मुलामध्ये अद्याप ही लक्षणे दिसलेली नाहीत. या दोघांवर उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यासोबत विमानामधून प्रवास केलेला एक सहप्रवासीसुद्धा कोरोनाबाधित असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.

दाम्पत्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. तपासणीत त्यांची मुलगी व त्यांना पुण्याला कॅबमधून आणलेल्या चालकाची तपासणी पॉझिटिव्ह आल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड परिसरातील तीन शाळा पूढील दोन-तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामन्यांबाबत काय निर्णय घ्यावा, यावर बुधवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.ताप आला आणि....बाधित दाम्पत्य १ मार्च रोजी दुबईहून मुंबईमध्ये आले. मुंबईमधून कॅबने पुण्याला आले. यातील पुरुषाला २ मार्च रोजी ताप आला. त्यांनी औषधे घेतल्यावर बरे वाटले. मात्र पुन्हा ताप व अंगदुखीचा त्रास झाला. औषधे घेण्यासोबतच त्यांनी मित्राच्या सल्ल्याने रक्त तपासून घेतले. त्या वेळी रिपोर्ट नॉर्मल आले. दोन दिवस बरे वाटल्यावर पुन्हा ताप आला. त्यांनी पुन्हा रक्त तपासणी केली. या तपासणीत मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली.

टॅग्स :corona virusकोरोनाPuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस