शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Corona virus : राज्यातील रिक्षाचालक हवालदिल : बँक खात्यात पैसे जमा करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 2:28 PM

राज्यातील रिक्षाचालकांची संख्या ७ लाखांच्या आसपास आहे. एकट्या पुण्यातच ८० हजारपेक्षा जास्त संख्या

ठळक मुद्देसरकारने रिक्षाचालकांच्या बँक खात्यात किमान ५ हजार रुपए जमा करावे : संघटनांचा दबाव कोरोना विरोधातील लढाईत आम्हीही सरकारबरोबरच आहोत, मात्र जगलो तरच लढता येईल

पुणे: रिक्षाचालकांची स्वत:च्या मालकीची रिक्षा असूनही त्यावर नियंत्रण ठेवणार्या सरकारने आता या रिक्षाचालकांच्या निर्वाहाचीही जबाबदारी घ्यावी, किमान कोरोना काळात तरी त्यांना मदत करावी अशी मागणी रिक्षा चालकमालक संघटनांकडून सरकारकडे करण्यात येत आहे.राज्यातील रिक्षाचालकांची संख्या ७ लाखांच्या आसपास आहे. एकट्या पुण्यातच ८० हजारपेक्षा जास्त रिक्षाचालक आहेत. त्यांच्यातील.काही मालक तर काही फक्त चालक आहेत. अनेक बेरोजगार युवक नोकरी मिळत नाही म्हणून या व्यवसायात आहेत. त्यातल्या अनेकांनी कर्ज काढून रिक्षा घेतल्या आहेत. सगळे सुरू असताना त्यांचे बरे चालले होतेआता मात्र त्यांचे हाल सुरू आहेत. व्यवसाय बंदच असल्याने ऊत्पन नाही. कुटुंब जगवायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सरकार रिक्षांचा वार्षिक विमा करा, दरवर्षी रिक्षा पासिंग करून घ्या, परवाना काढा, रिक्षाला अमूकच रंग द्या, तमूकच मिटर बसवा असे नियम लावून या व्यवसायावर नियंत्रण ठेवून आहे. त्याद्वारे रिक्षाव्यवसायाकडून सरकारला कोट्यवधी रुपए दरवर्षी मिळतात.त्यामुळे आता या बंद काळात सरकारनेच सर्व रिक्षाचालकांची जबाबदारी घ्यावी या मागणीचा जोर वाढला आहे. रिक्षा पंचायत या प्रमुख संघटनेने यासाठी पुढाकार घेतला आहे. सरचिटणीस नितीन पवार यांनी सांगितले की मुख्यमंत्री, कामगार मंत्री, परिवहन मंत्री यांच्याकडे यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.विमा कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेल्या रिक्षा विमा रकमेतून रिक्षाचालक मदत निधी जाहीर करावा, सरकारने रिक्षाचालकांच्या बँक खात्यात किमान ५ हजार रुपए जमा करावेत, तसेच कर्जदार रिक्षाचालकांच्या कजार्चे हप्ते संबधित बँकांनी किमान तीन महिने स्थगित ठेवावेत व त्यावर व्याज लावू नये या मागण्या आम्ही करत आहोत.समाजातील हा इतक्या मोठ्या संख्येचा सेवावर्ग दुर्लक्षित करून चालणार नाही याची जाणीव आम्ही सरकारला करून देणार आहोत असे पवार म्हणाले.कोरोना विरोधातील लढाईत आम्हीही सरकारबरोबरच आहोत, मात्र जगलो तरच लढता येईल अशी आमची भूमिका असल्याचे पवार म्हणाले. सनदशीर मागार्ने, म्हणजेच निवेदन देऊन सरकारकडे ही मागणी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस