शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : लॉकडाऊननंतर कोरोनाचे रुग्ण वाढणार, वेळेत उपचार देऊन मृत्युदर टाळावा; केंद्रीय पथकाच्या पालिकेला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 17:57 IST

आताची लढाई ही कोरोना संसर्ग रोखणे व मृत्युदर कमी करणे व विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था पूर्वरत करणे अशा दुहेरी पातळीवर आहे. 

ठळक मुद्देकेंद्रीय पथकाच्या पालिकेला सूचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा पुण्याचा पाहणी दौरा कोरोनाबाबत शहरातील सद्यस्थिती व भविष्यातील उपाययोजना याबाबत सूचना

पुणे : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय कायमस्वरूपी राहू शकत नाही. त्यामुळे लॉकडाऊननंतर कोरोनाचे रुग्ण संपूर्ण देशात वाढतच राहणार आहेत. अशावेळी कोरोनाबाधित व्यक्तींना वेळेत उपचार देणे व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना केंद्रीय पथकाने पुणे महापालिकेला दिल्या आहेत.   केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार यांच्यासह डॉ. अरविंद कुशवाह आणि डॉ. सितीकांता बॅनर्जी यांच्या पथकाने पुण्याचा पाहणी दौरा केला. या पथकाने गेली दोन दिवस पुणे शहरात विविध ठिकाणांना भेटी देऊन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सद्यस्थिती व भविष्यातील उपाययोजना याबाबत सूचना दिल्या.       यामध्ये त्यांनी आता यापुढील काळात कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी कसे होतील, यादृष्टीने चाचण्या वाढविणे  आणि आरोग्य व्यवस्था उभी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे नमूद केले आहे. लॉकडाऊन उठल्यावर दैनंदिन व्यवहारात प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत: घेणे हेच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनसह संपूर्ण शहरात कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी लागेल याबाबत जनजागृती करणे जरुरीचे आहे. आताची लढाई ही कोरोना संसर्ग रोखणे व मृत्युदर कमी करणे. व विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था पूर्वरत करणे अशा दुहेरी पातळीवर आहे.          पुणे शहरात प्रामुख्याने मृत्यू दर कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व अन्य आजार असलेल्या व्यक्तींच्या आरोग्य तपासण्या करण्यावर जास्त भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तपासण्या करून, पॉझिटिव्ह रुग्णांवर वेळेवर उपचार करणे हाच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच ज्या कोरोना बधितांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यूस कारणीभूत ठरणारे घटक यांचा अभ्यास करून भविष्यात त्या कारणाने मृत्यू होणार नाही याची काळजी घेणे जरुरी आहे. यासाठी प्रशासकीय व्यवस्था व आरोग्य व्यवस्था यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे निरीक्षण ही या पथकाने पुण्यातील पाहणीत नोंदविले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.   जेवढ्या जास्त तपासण्या तेवढ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढणार आहे. त्यामुळे आरोग्यसेवा मजबूत करताना आय.सी. यु. बेड, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची अधिकाधिक उपलब्धता करून संभाव्य मृत्यू टाळणे यासाठी प्राधान्याने काम करावे असेही या पथकाने सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर रामMayorमहापौर